
आई सुवर्णाने आपल्या काखेतील निरागस चिमुकली शिवान्याला विनोद इंगळेच्या दारात बेवारस सोडून पतीच्या मागे सैरावैरा पळत सुटली.
घाटबोरी (जि.बुलडाणा) : वाशीम जिल्ह्यातील चांडस येथील जेमतेम पंचविशितला पवन आणि मुर्तिजापूर जवळ असणाऱ्या खिरपूर येथील बाविशीतील तरूणी सुवर्णा बावणे हे दोघेही पुणे येथे नानापेठ येथे कामाला होते. योगायोगाने त्यांची तेथेच त्यांची जवळीक झाली.
पुढे, 25 डिसेंबर 2019 मध्ये पुणे येथील येरवडा येथे रितसर आंतरजातीय प्रेम विवाह झाला. त्यानंतर सुवर्णाने 19 सप्टेंबर 2020 ला चिमुकल्या शिवान्याला जन्म दिला.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
मात्र, पुढे जे घडले ते भयानक होते....
25 डिसेंबरला दुचाकीने पुण्यावरून मालेगाव तालुक्यातील चांडसला निघाले असताना अचानक रात्रीच्या वेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
त्यानंतर मेहकरमध्ये तीन-चार तास वेळ काढून त्यानंतर पवन हरिदास ताकतोडे व सुवर्णा बावणे यांनी पवनचा मावसभाऊ विनोद इंगळे रा.पांगरखेड येथे दुचाकीवर रात्री चार वाजता थंडीत कुडकुडत पोहचले.
विनोदच्या घराचे दरवाजे त्यावेळी बंद असल्याने, पवनने पत्नीला व चिमुकल्या मुलीला दारात सोडून दुचाकीवर पळ काढला.
आई सुवर्णाने आपल्या काखेतील निरागस चिमुकली शिवान्याला विनोद इंगळेच्या दारात बेवारस सोडून पतीच्या मागे सैरावैरा पळत सुटली.
दोघांच्या शाब्दिक वादात निरागस चिमुकली शिवान्या जेमतेम तीन महिन्याची थंडीत कुडकुडत रडत होती.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती, उडाली झोप, इंग्लंडवरून अकोल्यात पोहोचलेल्या आठ प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी
सकाळचे सहा वाजतात,
घरमालक विनोद इंगळे व आई शोभा मधुकर इंगळे यांना दारात बेवारस बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने एकदम खळबळ उडते.
हे बेवारस बाळ कुणाचे आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिक एकत्र होत गेले. परंतु, बेवारस बाळाच्या आई वडिलांचा शोध लागत नसल्याने फोनवर डोणगाव पोलिस स्टेशनला माहिती दिल्या गेली.
ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड, सहायक पो.उपनिरीक्षक अशोक झोरे, सहायक पो.उपनिरीक्षक अशोक नरुटे, महिला पोलिस कॉ.हर्षा खिल्लारे, पोलिस नाईक अजिस परसुवाले, विकास राऊत,नानाभाऊ काकड,अकतार शेख, नितीन खराडे,विष्णू जायभाये,यांनी पागरखेड गाठून बेवारस बाळाला ताब्यात घेऊन डोणगाव पोलिस स्टेशनला आणले.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
तातडीने ठाणेदार दीपक पवार यांनी तपासचक्र फिरवून अवघ्या तीन तासात बेवारस बाळाच्या आई- वडिलांचा शोध घेतला. शोध घेऊन बेवारस बाळाची आई सुवर्णा नारायण बावणे (ताकतोडे)व वडील पवन हरिदास ताकतोडे यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता या बेवारस बाळाचे आई- वडील असल्याची खात्री केली व चिमुकल्या शिवान्या नामक बाळाला आई सुवर्णा नारायण बावणे व वडील पवन हरिदास ताकतोडे यांच्या ताब्यात दिले.
पोलिस स्टेशनमध्ये केली व्यवस्था
बेवारस तीन महिन्याचे बाळ साठी पोलिस स्टेशन मध्ये झोका,बांधण्यात आला असता,या बाळाच्या आई वडीलाचा शोध लागेपर्यंत या बाळाला झोक्यामध्ये टाकून महिला पोलिस कॉ,हर्षा खिल्लारे, उपपोलिस निरीक्षक शिवाजी राठोड स्वत:हा बाळाला झोका देत होते हे एक विशेष....
बेवारस तीन महिन्याची मुलगी ही पांगरखेड येथे आढळल्याची अशी माहिती मिळाली. त्यानंतर बाळाला आम्ही ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. जलद गतीने तपास चक्र फिरवून आई- वडिलांचा शोध घेऊन पोलिस स्टेशन मध्ये आणून अधिक तपास केला असता, असे निष्पण निघाले की शाब्दिक वादातून सदर प्रकार घडला होता. त्यावेळी बेवारस बाळाचेच आई वडील आहेत म्हणून खात्री केली व सुखरूप या शिवान्या नामक बाळाला आई वडिलांच्या ताब्यात दिले.
-दीपक पवार, ठाणेदार, डोणगाव
(संपादन - विवेक मेतकर)