
कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता या इंग्लंडमध्ये नवीन प्रजातीचा कोरोना निर्माण झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. सध्याच्या या परिस्थितीत जो जुना कोरोना अस्तित्वात होता त्याच्यामुळे लाखो नागरिक या संसर्गजन्य आजाराने बाधित झाले तर हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला.
अकोला : इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ जण इंग्लंडहून भारतात परत आल्याची माहिती आहे. संबंधित प्रवाशी विमानाने मुंबई येथे उतरल्यानंतर त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित सर्व प्रवाशी अकोला जिल्ह्यात पोहचले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता या इंग्लंडमध्ये नवीन प्रजातीचा कोरोना निर्माण झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. सध्याच्या या परिस्थितीत जो जुना कोरोना अस्तित्वात होता त्याच्यामुळे लाखो नागरिक या संसर्गजन्य आजाराने बाधित झाले तर हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु आता कोरोना नवा अवतार समोर आला असून तो जुन्या पेक्षा अधिक घातक व वेगाने प्रसारित होत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
नव्या कोरोनाचे रुग्ण सध्या इंग्लंडमध्येच आढळत आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक परत मायदेशी येत आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ८ नागरिकांचा समावेश आहे. संबंधित नागरिक मुंबई येथून अकोल्यात दाखल झाले आहेत. परंतु त्यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याने तूर्तास आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.
हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक
सर्व प्रवाशी होम क्वारंटाईन
इंग्लंड येथून मुंबई मार्गे अकोल्यात पोहचणाऱ्या प्रवाशांना सध्या आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. संबंधित प्रवाशांना इतर ठिकाणी फिरण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी संबंधितांवर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.
(संपादन - विवेक मेतकर)