esakal | रेतीला आले सोन्याचे दिवस, गुजरात येथील वाळू येतेय वाशीमपर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Golden days have come to the sand, the sand from Gujarat is coming to Washim

कोणतेही बांधकाम असले तरी सर्वसामांन्यांना अग्रक्रमाने वाळूची व्यवस्था करावी लागते. मात्र, अशातच मागील तीन वर्षापासून वाळू घाटाचे लीलाव झाले नसल्यामुळे वाळूला सोन्याचे दिवस आले आहेत.

रेतीला आले सोन्याचे दिवस, गुजरात येथील वाळू येतेय वाशीमपर्यंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) :  कोणतेही बांधकाम असले तरी सर्वसामांन्यांना अग्रक्रमाने वाळूची व्यवस्था करावी लागते. मात्र, अशातच मागील तीन वर्षापासून वाळू घाटाचे लीलाव झाले नसल्यामुळे वाळूला सोन्याचे दिवस आले आहेत.

गुजरात येथील तापी नदीची वाळू वाशीम जिल्ह्यात २२०० रुपये टन भावाने विकली जात आहे. काही वाळू माफिया पैनगंगा नदीची रेती अवाच्या सव्वा भावाने चोरट्या मार्गाने विकत आहेत.

हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

मागील तीन वर्षापासून वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे बांधकामे प्रभावी झाली आहेत. बांधकाम मिस्त्री व मजूर यापैकी काहींनी तर चक्क त्यांचा व्यवसायच बदलला आहे.

वाशीम जिल्ह्यात जालना व बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. परंतु, रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

मध्यंतरी काही रेती वाहतूकदारांनी चोरून रेती विकण्याचा प्रयत्न केला होता. आजघडीला तालुक्यातील पैनगंगा नदीची रेती सहा ते सात हजार रुपये ब्रास प्रमाणे चोरून विकल्या जात आहे.

परंतु, ही रेती विकत ग्राहक घेणारे मात्र मर्यादित आहेत. रेतीच उपलब्ध नसल्यामुळे बांधकामे प्रभावित झाली असून, बांधकाम व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे काहींनी तर त्यांचा व्यवसाय बदलला आहे.

हेही वाचा -शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर

सध्या वाशीम जिल्ह्यात गुजरात येथील तापी नदीची रेती २२०० रुपये टनाने विकली जात आहे. पहिल्यांदाच रेती वजनाने विकल्या जात आहे. रेती घाट बंद असल्यामुळे बांधकाम व्यवसाय काही प्रमाणेच रेती वाहतूकदारही मागील दोन वर्षापासून आर्थिक संकटात सापडले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)