शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर

Akola Marathi News Shegaon, Shirdi Devdarshan devotees car accident, two killed, nine serious
Akola Marathi News Shegaon, Shirdi Devdarshan devotees car accident, two killed, nine serious

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) :  शेगाव ते शिर्डी देवदर्शनासाठी निघालेल्या देवठाणा जिल्हा वाशिम येथील भाविकांच्या स्कॉर्पिओ जीपला अपघात होऊन दोघे ठार तर नऊ गंभीर जखमी झाल्‍याची घटना शहरा लगतच्या वळण रस्त्यावर रविवारी रात्री साढे नऊ च्या सुमारास घडली भरधाव जीपने महामार्गावर उभ्या पोकलॅण्ड ला मागून धडक दिली.

दरम्यान थंडीची तमा न बाळगता शहरातील ॲम्बुलन्स, पोलीस कर्मचारी व युवकांनी तातडीने मदत करून जखमींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील देवठाणा येथील अकरा भाविक शेगाव ते शिर्डी देवदर्शना निघाले होते सायंकाळी शेगाव येथून शिर्डी कडे जात असताना शहरा बाहेरून जाणाऱ्या महामार्गावर औरंगाबाद कडे पोकलॅण्ड घेऊन जाणारा ट्राला पंचर झाल्याने पोकलॅण्ड रस्त्याच्या बाजुला उतरवून ट्राला पुढे पंचर बनवण्यासाठी निघून गेला दरम्यान बायपास वरील कट्ट्या नजीक रस्त्यावर उभा असलेल्या पोकलँडला भाविकांच्या भरधाव जीप क्रमांक एम.एच २२ यू ६५२१ ने मागून जोरदार धडक दिली.

हा अपघात एवढा भयंकर होता की धडक दिल्यावर भाविकांची जीप दहा फूट मागे फेकली गेली सदर अपघाता ची माहिती मिळताच शिंदे हॉस्पिटल व  श्री बालाजी महाराज संस्थांच्या ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचल्या अपघातग्रस्त जीपमध्ये अकरा भाविक गंभीर रित्या जखमी झाले होते स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण घुगे,उपनिरीक्षक बसवराज तमशेट्टे,पोलीस कॉन्स्टेबल विजय किटे,सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघ,शैलेश मललावत, बाळू उदार,व ॲम्बुलन्स चालक यांनी जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविले वैद्यकीय अधीक्षक डॉ.अस्मा शाहीन व त्यांच्या सहकरी डॉक्टरांनी जखमींवर उपचार केले .

दरम्यान जखमींपैकी प्रवीण अभिमान हिंबाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान ज्ञानेश्‍वर काशीनाथ खडसे राहणार देवठाणा जिल्हा वाशिम यांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला तर भागवत रामेश्वर वानखेडे,आकाश दिगंबर खडसे,ज्ञानेश्वर लक्ष्मण खडसे,गणेश रामदास इंगोले,राम फकीरा काळे,आकाश मारुती राऊत,सुनील श्रीराम हिंबाळे,वैभव रामेश्वर खडसे, गणेश कैलास गावंडे सर्व राहणार देवठाणा (जिल्हा वाशिम) गंभीर जखमी झाले.

जखमी पैकी बहुतांश व्यक्तींना औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे रवी अभिमान हींबाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या जगताप लिहिलेल्या पोकलॅण्ड चालकाविरुद्ध आपल्या आवाहनास रेडियम न लावता धोकादायक स्थितीत पोकलॅण्ड उभा करून अपघातास व  मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक तमशेट्टे तपास करीत आहे अपघात घडल्यानंतर रात्री साडेदहा पर्यंत जखमींना जीप मधून काढून रुग्णालयात हलविण्यात येत असताना शहरातून सुसाट वेगाने धावणाऱ्या ॲम्बुलन्स चा थरार बघून अनेकांच्या हृदयाचा थरकाप उडाला

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com