शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, प्रयोग झाला यशस्वी; पशुवैद्यक ठरविणार आता मादी किंवा नर पैदास!

Akola Marathi News Good news for farmers, the experiment was successful; Veterinarians will now decide whether to breed females or males!
Akola Marathi News Good news for farmers, the experiment was successful; Veterinarians will now decide whether to breed females or males!

अकोला :  आतापर्यंत नर किंवा मादी जन्मने हे निसर्गाच्या हातात होते परंतु, शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे हे चित्र बदलले आहे. आता मादी किंवा नर पैदास करावयाचा हे पशुवैद्यक डॉक्टर ठरवणार असून, म्हशीमध्ये लिंग वर्गीकृत रेतनाद्वारे मादी रेडके पैदाशीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.


गाई, म्हशींपासून दुग्धोत्पादन करणे हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा आहे. संकरित गाई किंवा म्हशीपासून दुग्धोत्पादन करून उत्तम असा चरितार्थ राबविणारे बरेच पशुपालक आहेत. वळू संगोपन करून गाय किंवा म्हैस फळवणे व पुढील वेतासाठी तयार करणे ही खर्चिक बाब पशुपलकांना परवडणारी नाही.

त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे म्हैस फळवणे सध्याच्या परिस्थितीत सोपे झाले आहे. परंतु, कृत्रिम रेतनद्वारे गर्भधारणा करून जर नर पैदा झाला तर नर किंवा रेडकांचा उपयोग कमी असल्यामुळे पशुपालकांना बऱ्याच प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. गर्भनिर्मिती होताना नर किंवा मादीचा गर्भ तयार होणे हे शुक्राणू ठरवतात.

याचा शोध बऱ्याच दशकाआधी लागला. पण सध्यस्थितीत नवीन तंत्रज्ञानाद्वारे शुक्राणुच्या केंद्रातील जणूकांच्या प्रमाणाचे मापन करून शुक्राणूंचे लिंग वर्गीकरण करण्यात येते. लिंग वर्गीकृत शुक्राणूपासून गोठीत विर्यकांडी तयार करण्यात आल्या असून, त्याचा वापर कृत्रिम रेतनासाठी करण्यात येतो.

महाराष्ट्र पशू व मत्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत स्तानकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थाच्या पशुप्रजनन विभागामार्फत राबविलेल्या ‘म्हशींमध्ये लिंगवर्गीकृत रेतनमात्रेचा गर्भधारणेकरिता परिणाम’ संशोधन प्रकल्प यशस्वी झाला आहे. या संशोधन प्रकल्पाकरिता आत्मा प्रकल्प संचालक अकोला यांचेकडून एक लाख रुपये निधी प्राप्त झाला होता.

पशुप्रजनन व प्रसुतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. महेशकुमार इंगवले यांनी प्रकल्प प्रमुख कार्य पाहिले तर, प्रकल्पाची अमलबजावणीकरिता पशुप्रजनन व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चैतन्य पावशे, डॉ. सुजाता सावंत, डॉ. प्रवीण शिंदे, पी.डी. पाटील यांनी सहकार्य केले. प्रवीण घाटोळ व सुशांत घोगटे या पशुपालकांच्या प्रक्षेत्रांना संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता व चमूने भेट देऊन जन्मलेल्या मादी रेडकांची पाहणी केली.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

असा राबविला प्रकल्प
विदर्भामध्ये प्रथमच राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये म्हैसवर्गीय तसेच माजाचे एकत्रिकरण केलेल्या म्हशींमध्ये लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतन करण्यात आले. या प्रकल्पामध्ये २० म्हशींना माजाच्या कालावधीमध्ये लिंगवर्गीकृत रेतनमात्रेमध्ये गर्भधारणेचे प्रमाण ४० टक्के इतके मिळाले. यातून सात मादी रेडके जन्मास आली. लिंगवर्गीकृत रेतनाद्वारे मादी रेडके मिळण्याचे प्रमाण ८७.५० टक्के होते. लिंगवर्गीकृत रेतनमात्रेचा दर एक हजार रुपये प्रतिरेतन मात्रा इतका झाला असून, यामुळे उच्च वंशावळ असणाऱ्या मुऱ्हा प्रजातीच्या म्हशीच्या मादी वासरे पुढील पिढी म्हणून तयार झाली आहेत.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाचे फायदे
लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाच्या वापरामुळे नर रेडके तयार होत नसल्यामुळे उत्तम दुग्धोत्पादन असणाऱ्या म्हशींपासून चार किंवा अधिक मादी रेडके तयार होतील व उत्तम वंशावळ असणारी पुढील म्हशींची पिढी निर्माण होईल. नर रेडकाच्या जन्मास अटकाव होईल तसेच संगोपन खर्च कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे बाजारातून महागड्या म्हशी विकत घेण्याचे प्रमाण कमी होईल. यामुळे म्हैस पालकांना याचा वापर केल्यास उत्तम पिढी निर्माण होऊन दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर तसेच सक्षम होण्यास मदत होईल.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com