
निवडणुकी आल्या की काही किस्से हमखास बघायला, ऐकायला मिळतात. निवडणूक म्हणजे प्रचंड आहमहमिका. या स्पर्धेत प्रत्येक जण आपली प्रतिष्ठापणाला लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो.
मूर्तिजापूर (जि.अकोला) : निवडणुकी आल्या की काही किस्से हमखास बघायला, ऐकायला मिळतात. निवडणूक म्हणजे प्रचंड आहमहमिका. या स्पर्धेत प्रत्येक जण आपली प्रतिष्ठापणाला लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतो.
त्यातूनच काही अफलातून प्रकार घडतात. असाच प्रकार या तालुक्यातील निंभा गावात घडला असून दोन सख्खे भाऊ ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने तसेच मामे सासू व भाससून एकाच वार्डात उभ्या आसल्याने तेथील लढतींमध्ये रंगत निर्माण झाली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील ९ सदस्यीय निंभा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन सख्खे भाऊ एकाच वार्डात उभे आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग क्रमांक ३ मध्ये ३ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यापैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. या दोन भावांसह एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
हेही वाचा -चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
एकूण ५५० मतदान मतदार फैसला करतील. बाबाराव सुदाम सोनोने व अनिल सुदाम सोनोने या दोघा भावांपैकी कुणाच्या पारड्यात मतांची संख्या जास्त पडते, हा उत्सुकता आणि चर्चेचा विषय झाला आहे. दोन सख्खे भाऊ एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याने तिसऱ्याचा लाभ होता का? असा प्रश्न ग्रामस्थांच्या चर्चेत उपस्थित केला जात आहे.
निकाल ठरणार लक्षवेधी
ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या दोन सख्खे भाऊ एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले, तरी दोघांपैकी कुणाच्याही गाळ्यात विजयश्रीची माळ पडल्यास सदस्य घरातलाच असेल, असाही विषय चर्चीला जात आहे. याच गावातील प्रभाग क्रमांक १ मधून मामेसासू व भाससुन एकमेकींच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात असल्याने तोसुद्धा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे हे दोन्ही निकाला लक्षवेधी ठरणार, एवढे मात्र निश्चित.
(संपादन - विवेक मेतकर)