पालकमंत्री बच्चू कडू ॲक्शन मोडवर, १० वैद्यकीय अधिकारी; ४५ आरोग्य सेवकांवर केली निलंबनाची कारवाई

Akola Marathi News Guardian Minister Bachchu kadu on bitter action mode, 10 medical officers; Suspension action taken against 45 health workers
Akola Marathi News Guardian Minister Bachchu kadu on bitter action mode, 10 medical officers; Suspension action taken against 45 health workers

अकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्तव्य बजावण्यायेवजी दांडी मारणाऱ्या १० वैद्यकीय अधिकारी (एमओ) व ४५ आरोग्य सेवकांना ८ दिवसांसाठी निलंबित करण्याचे व त्यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. २५) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.

याव्यतिरीक्त बैठकीत सर्वच आमदारांच्या मतदारसंघात बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या धर्तीवर जिल्हा वार्षिक योजनेतून कामे (निधी) देण्याचे आश्वास पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एक वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत नोटीस वरील ८ विषयांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यासोबत इतर विषयांवर वादळी चर्चा करण्यात आली. सभेत नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अमोल मिटकरी, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार हरीष पिंपळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने, जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा नियोजन अधिकारी जी.के. शास्त्री व सर्वच शासकीय यंत्रणांच्या विभाग प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

आमदार मिटकरींनी वाचला तक्रारींचा पाढा
बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अव्यवस्थेचा पाढा वाचला. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये कमालाची अवस्था असल्याचे त्यांनी सभेचे अध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात आणून दिले. ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना भेटी दिल्या असता त्याठिकाणी आरोग्य कर्मचारी गैरहजर राहत असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी नियुक्त एकच कर्मचारी हजेरी पुस्तिकेवर इतर ८-९ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांना माहिती दिल्यानंतर सुद्धा उपकेंद्रातील स्थितीमध्ये सुधारणा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना डॉ. आसोले यांनी उपकेंद्रातील अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी व वस्तुस्थितीची पाहणीकरण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. पथकाच्या अचानक भेटी दरम्यान १० वैद्यकीय अधिकारी व ४५ आरोग्य कर्मचारी अनुपस्थित आढळल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचेही डॉ. आसोले यांनी सांगितले. परंतु पालकमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश देत संबंधिताना ८ दिवसांसाठी निलंबित करण्याचे व वेतनवाढ रोखण्याचे सांगितले.

हेही वाचा -शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर

बाळापूरला झुकते माप का? आम्हालाही निधी द्या!
बाळापूर व पातूर तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले आहेत. सदर रस्त्यांचे काम जिल्हा परिषदेयेवजी थेट सार्वजनिक बांधकाम विभाग करेल. हा विषय सभेच्या सुरुवातीलाच आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी सर्वच तालुक्यांसाठी निधी देताना समान धोरण ठेवावे. बाळापूर विधानसभा मतदारसंघातच कामाची घाई का करण्यात येत आहे, आमच्या मतदारसंघात का नाही? आपण पालकमंत्री जिल्ह्याचे की बाळापूरचे, असे त्यांनी विचारले. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रयोगिक तत्वावर एकाच तालुक्यात निधी दिल्याचे सांगितले. इतर आमदारांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघातून प्रस्ताव सादर करावा, त्यांना सुद्धा निधी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा -बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय

‘ईई’वर सेवा हमी कायद्यानुसार कारवाई
सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी शेगाव-अकोट रस्ता (दापूरा ते मनब्दा रस्ता) अतिशय खराब झाल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्षभरापूर्वीच रस्ता बांधण्यात आल्यानंतर सुद्धा त्याची स्थिती दयनीय झाल्याच्या मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर रस्ता काळ्यामातीत बनवण्यात आल्याने खराब झाल्याचे उत्तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी (ईई) दिले. सदर उत्तर योग्य नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. त्याच वेळी आमदार हरिष पिंपळे यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या विषयावर संबंधित ईईंनी त्यांच्या पत्राचे उत्तर अद्याप न दिल्याचे सांगत विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. त्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यावर सेवा हमी कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश सभेत दिले.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com