बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 23 January 2021

शहरातील उच्चभ्रू वस्तीत हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या डॉक्टरसह तीघांना शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ अटक करून पोलीस अधिक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.

अकोला: शहरातील जवाहर नगर भागातील उच्चभ्रू वस्तीत हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या डॉक्टरसह तीघांना शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ अटक करून पोलीस अधिक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकाने सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.

शहरातील उच्चभ्रू भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या जवाहर नगर भागात तेजस्वी हेल्थ केअर सेंटर आहे. या ठिकाणी डॉ. प्रदीप देशमुखने महिलांच्या माध्यमातून देह व्यापार मांडल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकास प्राप्त झाली.

हेही वाचा -आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?

पथक प्रमुख विलास पाटील यांनी माहीतीची पडताळणी केल्यानंतर शहर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या नेतृत्वात या सेंटरवर शुक्रवारी रात्री उशीरा छापा टाकण्यात आला.

हेही वाचा -अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!

यावेळी डॉ. प्रदीप देशमुख याच्यासह संतोष सानप, रतन लोखंडे व पिडीत महिलेस ताब्यात घेण्यात आले. पथकाच्या तक्रारीवरून सिव्हील लाइन पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News The prostitution started under the name of Health Care Center, three people including a doctor were arrested