विमा कंपनीनेच लावला शेतकऱ्यांना 96 लाखांचा चुना

Akola Marathi News Insurance Company defrauds farmers of Rs 96 lakh
Akola Marathi News Insurance Company defrauds farmers of Rs 96 lakh

अकोला : मंडळाच्या नावातील चुकीने विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची ९६ लाखाने फसवणूक करण्यात आली. चुकी दुरुस्तीसाठी वारंवार विनंती करूनही कंपनीने सुधारणा केली नाही. अखेर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे विमा कंपनीच्या विरोधात तक्रार देवून गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.


खरीप हंगाम २०१९ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कौलखेड जहाँगीर (ता.अकोला) येथील शेतकऱ्यांनी ऑन लाईन विमा हप्ता अदा केला होता. मात्र कौलखेड या नावातील सारखेपणामुळे पळसो बढे मंडळात येणाऱ्या कौलखेड जहाँगीर येथील शेतकऱ्यांची नावे अकोला तालुक्यातच नव्याने तयार झालेल्या शहरालगतच्या कौलखेड मंडळात समाविष्ट करण्यात आले. झालेली चूक लक्षात आणून देत शासन तसेच विमा कंपनीचे सर्व संबंधितांना वेळोवेळी सूचित करण्यात आले.

अद्यापपर्यंत विमा कंपनीने झालेली चूक दुसुस्त केली नाही. दोन्ही मंडळात सोयाबीनसाठी मंजूर झालेला विम्याच्या रकमेत फरक असल्याने कौलखेड जहाँगीर येथील शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली. ही रक्कम तब्बल ९६ लाख रुपये आहे. तांत्रिक दोषाबाबत ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, मुंबई यांनी राज्य शासनाकडे बोट दाखवून हात वर केले आहे.

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपनीच्या विरोधात आमदारांनी पोलिस तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा आमदारांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांना दिला आहे. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांचे समवेत प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, शंकरराव वाकोडे, माधव मानकर, गिरीश जोशी मनिराम ताले, अंबादास उमाळे, गणेश तायडे, जयंत मसने, गोपाल मुळे, योगेश गावंडे, विठ्ठल वाकोडे, मनोहर मांगटे पाटील, शेषराव पाटील इंगळे, बबलू वासू, नरेंद्र वाकोडे, नागोराव वाकोडेसह इतर शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मंजूर २३ हजार, मिळाले १४ हजार!
खरीप हंगाम २०१९ मधील पळसो मंडळामध्ये सोयाबीन पिकांकरिता प्रती हेक्टर २३ हजार ७०० रुपये रक्कम मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना १४ हजार ४०० दराने रक्कम देण्यात आली. यातील फरकाची उर्वरीत रक्कम ९ हजार ३०० प्रती हेक्टर शेतकऱ्यांना कमी मिळाली आहे. ही फरकाची रक्कम ९५ लाख ६९ हजार ७०० रुपये इतकी आहे.

हेही वाचा -  रोजगार हमीत लाखोंचा अपहार, तीन अधिकाऱ्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

विमा कंपनीकडून प्रतिसाद नाही
विमा राशीच्या फरकाची देय रक्कम तातडीने कौलखेड जहाँ येथील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला व रिजनल मॅनेजर, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, मुंबई यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व कृषी कार्यालयामार्फत वेळोवेळी कळविलेले आहे. परंतु विमा कंपनी कोणताही प्रतिसाद देण्यास तयार नाही. त्यामुळे २७७ शेतकरी पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.

(संपादन - विवेक  मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com