esakal | पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Police reconciled the relationship

विवाह म्हटले की, मडक्याला मडके लागतेच त्यात कधी न पाहलेल्या पुरूष किंवा महिले सोबत संसाराचे गाडे चालविणे म्हणजे मोठ्या हिंमतीचे काम आहे. कधी पती-पत्नीत तर, कधी सासू, दीर, नदन यांच्या सोबत वाद होत असल्याने अनेक संसार उद्‍ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.

पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’

sakal_logo
By
सिद्धार्थ वाहुरवाघ

अकोला :  विवाह म्हटले की, मडक्याला मडके लागतेच त्यात कधी न पाहलेल्या पुरूष किंवा महिले सोबत संसाराचे गाडे चालविणे म्हणजे मोठ्या हिंमतीचे काम आहे. कधी पती-पत्नीत तर, कधी सासू, दीर, नदन यांच्या सोबत वाद होत असल्याने अनेक संसार उद्‍ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.

अशाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या घटनेतील कुटुंबाचा संसार उद्‍ध्वस्त होऊ नये यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आणि कधी काळी एकमेकांचे वैरी समजणारे कुटुंब एकत्र होऊन यापुढे वाद न घालण्याची ग्वाही देऊन हसत मुखाने घरी परत गेले.

हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाभूळगाव येथील सुगरा प्रवीण मन्सूर अली (वय ३०) यांचा विवाह वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील रहिवासी व्यक्तीसोबत झाला. विवाहानंतर त्यांना दोन सुंदर मुलं झाली.

परंतु, गत सहा महिन्यापासून दोघांचे पटत नसल्याने दोघेही वेगवेगळे राहू लागले. दुसऱ्या प्रकरणातील शिवणी येथील संध्या पाटेकर यांचा विवाह नाशिक येथील व्यक्तीसोबत झाला त्यांनादेखील दोन आपत्य आहेत. त्यांच्या सुद्धा काही कारणाने वाद झाला आणि, गत दोन वर्षांपासून त्या देखील पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. दोन्ही प्रकरणातील कुटुंबातील सुज्ञ व्यक्तींनी तडजोड न करता पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली.

हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

परंतु, वाद मिटविण्याच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी त्यांना आपसात समजोता करण्याच्या उद्देशाने ‘भरोसा’ सेल येथे तक्रार दाखल करून वाद तिथेच संपवून पुन्हा संसार थाटण्यासाठी दोन्ही प्रकरणातील महिला व त्यांच्या नातेवाईकांना पाठविण्यात आले. परंतु, वाद मिटण्याचे नाव घेत नसल्याने ‘भरोसा सेल’ यांनी गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रकरण एमआयडीसी पोलिस स्टेशनला पाठविले.

हेही वाचा - अधिक बातम्यांसाठी क्लिक करा

दोन्ही प्रकरणातील महिला आपल्या आई-वडील व इतर नातेवाईकांना सोबत घेऊन पोलिस स्टेशनला आल्या. प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस स्टेशनचे ठाणेदारांनी दोन्ही महिलेंच्या सासरकडील मंडळीला पोलिस स्टेशनला बोलाऊन घेतले आणि, प्रकरण बारकाईने हातळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कुटुंबातील सुज्ञ व्यक्ती आणि सदर पती-पत्नीला व्यवस्थीत समजावून सांगितले. दोन्ही महिला त्यांचे पती व कुटुंबातील इतर सदस्यांना पटल्यानंतर त्यांनी आपसात समजोता करून प्रकरण इथेच मिटविले व भविष्यात कौटुंबीक वाद होतील नाही याची श्‍वास्वती दिली.

हेही वाचा -  कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

...अन् सोडला सुटकेचा श्‍वास
पती-पत्नीच्या वादात मुला-बाळांचे होणारे हाल-अपेष्टा लक्षात घेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला. दोन्ही कुटुंबातील महिला त्यांच्या पती, मुलांसोबत हसत-हसत घरी गेल्याने पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन सानप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बोदडे, महिला पोलिस नाईक सिंधू गवई, पोलिस हवालदार दयाराम राठोड यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image