esakal | चला व्यसनाला बदनाम करूया ! फटाकेमुक्त नववर्ष साजरे करू या !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Lets defame addiction! Lets celebrate Fireworks Free New Year!.

सध्या समाजात व्यसनाचे उद्दात्तीकरण होताना दिसते आहे. या मुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असे असताना महाराष्ट्र शासन मात्र महसूल वाढवण्यासाठी समाजात व्यसन वाढवण्याला प्रोत्साहन देताना दिसते. त्यामुळेच व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने समग्र व्यसन विरोधी नीती जाहीर करावी यासाठी देखील या दरम्यान पाठपुरावा केला जाणार आहे.

चला व्यसनाला बदनाम करूया ! फटाकेमुक्त नववर्ष साजरे करू या !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला: गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला सेलीब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढी मध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जावून व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमीवर महा. अंनिस डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेली ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ ही व्यसन विरोधी मोहीम दरवर्षी राबवत आहे.

सध्या समाजात व्यसनाचे उद्दात्तीकरण होताना दिसते आहे. या मुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असे असताना महाराष्ट्र शासन मात्र महसूल वाढवण्यासाठी समाजात व्यसन वाढवण्याला प्रोत्साहन देताना दिसते. त्यामुळेच व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने समग्र व्यसन विरोधी नीती जाहीर करावी यासाठी देखील या दरम्यान पाठपुरावा केला जाणार आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साजरे करताना सर्वत्र फटाक्याचा वापर भरपूर होतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, बालमजुरीला प्रोत्साहन, लाखो रुपयांचा चुराडा, अपघात, पर्यावरणाचा ऱ्हास या सारखे दुष्परिणाम होतात. त्यामुळे या वर्षीचा ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरला प्रदूषणकारी फटाके न फोडता, एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देवून निरोगी व आनंदाने सण साजरे करा असे आवाहन या अभियानाद्वारे महाराष्ट्र अंनिस तर्फे करण्यात येत आहे.

या अंतर्गत राज्यभरात व्यसन विरोधी युवा निर्धार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.  या मेळाव्यामध्ये तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. व्यसनमुक्ती दूताचे प्रशिक्षण घेतलेले युवक युवती पुढील आठवड्यामध्ये समाजात व्यसनच्या विरोधी पोस्टर प्रदर्शन, व्यसन विरोधी फिल्म शाळा कॉलेजमध्ये दाखवणे, गावामध्ये व्यसन विरोधी फेरीचे आयोजन करणे, शाळा कॉलेजमध्ये व्यसनाविषयी भाषण देणे, दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन, व्यसनविरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्स वर नागरिकांच्या सह्या घेणे तसेच सोशल मिडिया मध्ये व्यसन विरोधी संदेश प्रसारित करणे असे कार्यक्रम ठीक ठिकाणी करण्यात आले.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दारू नको दूध प्या, फटाके नको भेटवस्तू द्या
३१ डिसेंबरला ‘दारू नको दूध प्या, फटाके नको भेटवस्तू द्या’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात येणार आहे . तसेच उपस्थित नागरिकांना दुधाचे मोफत वाटप देखील करण्यात येणार आहे.

तसेच ३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ठिकठिकाणी व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचा स्नेहमेळावे देखील आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी ह्या मोहिमे मध्ये सहभागी होवून व्यसन विरोधी कार्यक्रमात पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीद्वारे करण्यात आले आहे. 

(संकलन, संपादन - विवेक मेतकर)

loading image