
निधी असूनही तो वेळेत खर्च न करू शकलेल्या जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या आदेशाने मोठा फटका बसला आहे. जिल्हा परिषदेतील पावणे चार कोटीचा रस्ते दुरुस्तीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करीत जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची कामे या यंत्रणेकडून करून घेतली जाणार आहे.
अकाेला : निधी असूनही तो वेळेत खर्च न करू शकलेल्या जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या आदेशाने मोठा फटका बसला आहे.
जिल्हा परिषदेतील पावणे चार कोटीचा रस्ते दुरुस्तीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करीत जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची कामे या यंत्रणेकडून करून घेतली जाणार आहे.
हेही वाचा - ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....
जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असलेली विकास कामे राज्य सरकारच्या अखत्यारित येत असलेल्या अन्य यंत्रणांकडून पूर्ण करून घेण्याचा आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा वार्षिक नियोजन आढावा बैठकीत दिला होता.
त्या आदेशाची अंमलबजावणी करीत जि.प.च्या ताब्यात असलेल्या तीन रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जात आहे. या तीन रस्त्यांसाठी ३ काेटी ७५ लाखाच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
हेही वाचा - आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!
त्यात बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील जुने धनेगाव ते नवे ग्राम या दरम्यानाचे रस्त्याचे काम हाेणार आहे. पातूर तालुक्यातील भंडारज बु. येथील पातूर ते भंडारज आणि साेनुना ते पांढुर्णा येथील रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा - शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर
विकास कामांवरून शिवसेना-वंचित संघर्ष
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ज्या तीन रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहेत, ती तिन्ही कामे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघातील आहेत.
हेही वाचा - बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय
त्यामुळे जिल्हा परिषदेत आता सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी व विरोधी पक्ष शिवसेना यांच्यात विकास कामांवरून संंघर्ष बघावयास मिळणार आहे. यापूर्वीही काही विकास कामांवरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले असून, न्यायालयापर्यंत प्रकरणे पोहोचले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)