
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सदर योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ९ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.
अकोला : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख १३ हजार ९४८ शेतकऱ्यांना शुक्रवार (ता. २५) पूर्वीच पहिला हप्त्याचे मानधन मिळाले आहे.
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सदर योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ९ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकरी वर्षाला त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास दोन लाखांवर शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.
हेही वाचा - कोरोनाची धास्ती, उडाली झोप, इंग्लंडवरून अकोल्यात पोहोचलेल्या आठ प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी
लाभार्थी संख्येत अकोट तालुका पुढे
जिल्ह्याती सात तालुक्यांत राहणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अकोट तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत योजनेअंतर्गत मानधन जमा करण्यात आले आहे. अकोट तालुक्यातील ३७ हजार ६६६ शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता, ३६ हजार २९८ शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता, ३३ हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात तिसरा हप्ता, २५ हजार ७२५ शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा हप्ता, २३ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या खात्यात पाचवा हप्ता तर १३ हजार २०६ शेतकऱ्यांच्या खात्यात शुक्रवार (ता. २५) पूर्वीच सहावा हप्ता म्हणजेच संपूर्ण ६ हजार रुपये मानधन जमा झाले आहे. लाभार्थी संख्येच्या बाबतीत त्यानंतर अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा क्रमांक येतो.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
शुक्रवार पूर्वीच शेतकऱ्यांना मिळालेले मानधन (लाभार्थी शेतकरी)
- पहिला हप्ता - २ लाख १३ हजार ९४८
- दुसरा हप्ता - २ लाख २ हजार ६५१
- तिसरा हप्ता - १ लाख ९१ हजार ५०४
- चौथा हप्ता - १ लाख ३८ हजार ८६९
- पाचवा हप्ता - १ लाख २४ हजार ९६२
- सहावा हप्ता - ६९ हजार ५६१
(संपादन - विवेक मेतकर)