मुलांनी झिडकारलं तरी सापडला आशेचा किरण, मुलांनी बेदखल केलेल्या आईला मिळाला आधार

Akola Marathi News At Murtijapur, a mother who was evicted by her children got a subsistence allowance
Akola Marathi News At Murtijapur, a mother who was evicted by her children got a subsistence allowance

मूर्तिजापूर (जि.अकोला): आई, वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी निर्माण झालेल्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत अवघे पाऊणशे वयमान असणाऱ्या वयोवृध्देस तिच्या मुलांकडून निर्वाहभत्ता मिळवून देणारा आदेश पारीत करून येथील उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी मुलांनी बेदखल केलेल्या मातापित्यांना आशेचा किरण दाखविला.


मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील सुमनबाई एकनाथ घनोट या ७५ वर्षीय वृद्धेने उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिलेल्या १९ नोव्हेंबर २०१९ च्या आर्जावर १ वर्ष ११ महिने ११ दिवस कार्यवाही होऊन मंगळवारी (ता.२९) आदेश पारीत झाला.

या वृद्धेच्या अर्जानुसार तिला पाच मुले आहेत. रामहरी व रामकृष्ण ही दोन मुले आणि प्रथमेश हा नातू यांनी त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन पिंपळशेंडा येथील शेतजमीन व राजुरा घाटे येथील खुली जागा बक्षीसपत्र करवून हडप केल्याचा व घरातून काढल्याचा आरोप सुमनबाईने केला होता.

प्रलंबित फेरफार रद्द करावा व १० हजार रुपये निर्वाहभत्ता मिळावा, अशी मागणी या वृद्धेने अर्जात केली होती. याप्रकरणी वृद्ध महिलेसह रामहरी, रामकृष्ण, जानराव, विठ्ठल, नारायण या तिच्या पाच मुलांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.

समेटकर्ता सतिश अग्रवाल यांच्याकडे प्रकरण पाठविण्यात आले. ते असमर्थ ठरले. तलाठ्यामार्फात चौकशी झाली. अंतिम सुनावणीत संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आदेश पारीत झाला. वृद्ध आईच्या अज्ञानाचा फायदा घेऊन इतर वारसांना विश्वासात न घेता झालेले बक्षीसपत्र, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी आई, वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम-२००७ च्या कलम २३ च्या तरतुदीनुसार, अवैध असल्याचा आदेश दिला.

रामकृष्ण हा मुलगा शासकीय नोकरीत असल्यामुळे त्यांनी दरमहा १५०० रुपये तसेच रामहरी, जानराव, विठ्ठल, नारायण या चार मुलांनी प्रत्येकी एक हजार रूपये सुमनबाईंचा बँक खात्यावर १५ दिवसाचे आत जमा करावे व त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत नियमीतपणे जमा करावेत, असा आदेश पारीत करून वयोवृद्ध मातेला दिलासा दिला.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com