
तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमधून ३२२ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ८२३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एक अर्ज नामंजूर करण्यात आला. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती अविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .
तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमधून ३२२ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ८२३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एक अर्ज नामंजूर करण्यात आला. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती अविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .
गुरुवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी तहसील कार्यालय येथे करण्यात आली. यामध्ये बेलखेड येथील एका उमेदवाराचा अर्ज नामंजूर करण्यात आला. सदर उमेदवाराचे नाव मतदार यादीमध्ये नसल्यामुळे ८२३ पैकी एकमेव अर्ज नामंजूर करण्यात आला.
एका उमेदवाराने आपले नामनिर्देशनपत्र मागे सुद्धा घेतले. तालुक्यात होऊ घातलेल्या ३४ ग्रामपंचायतींपैकी चांगलवाडी, खेल सटवाजी, वरुड बिहाडे , जस्तगाव, राणेगाव , वडगाव रोठे या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कारण या सहा ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये केवळ एक किंवा दोनच अर्ज शिल्लक असल्यामुळे सदर एक दोन उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे याकरिता गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या सहा ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांनी बसून पॅनल तयार केल्याचे समजते.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक-दोन अर्ज शिल्लक असल्यामुळे त्याचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याकरिता त्यांची मोठी मनधरणी करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ४ जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत कोण कोण उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतात? कोणते प्रभाग कोणत्या ग्रामपंचायती अविरोध होतात? याचे संपूर्ण चित्र ४ जानेवारीला दुपारून स्पष्ट होणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)