
दहशतवाद विरोधी पथक बाळापूर परिसरात गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करत असताना बाजारामध्ये ऑनलाइन जुगार चालत असल्याची पथकाला मिळाली. त्यावर पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी जुगारावर छापा मारत ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपींना अटक केली.
अकोला : दहशतवाद विरोधी पथक बाळापूर परिसरात गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करत असताना बाजारामध्ये ऑनलाइन जुगार चालत असल्याची पथकाला मिळाली. त्यावर पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी जुगारावर छापा मारत ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपींना अटक केली.
बाळापूर येथे मारण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान ८ जण कॉम्प्यूटररच्या सहाय्याने एलईडी स्क्रीनवर एका ॲपचा वापरकरून पैसे जुगार खेळताना आढळून आले.
त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याजवळून दोन हजार रुपये रोख, सीपीयू आणि की-बोर्ड, एलईडी स्क्रीन रिमोट डोंगल किंमत ३० हजार रुपये, तीन मोबाइल किंमत २० हजार रुपये असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
पोलिसांनी आरोपी उमेश रत्नाकर इंगळे, शेख असलम शेख रऊफ, विनोद जानराव उमाळे, शेख इस्माईल शेख यूसुफ, जगदीश इंद्रजीत सिंग ठाकूर, गुलाम यूनुस गुलाम शब्बीर, फारूख खान अंसार खान, मिथून तेजराव इंगले (सर्व रा. बाळापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)