
गावातील नात्यातील असलेला बाळू करे व त्याचे भाऊ हे गावात अवैध दारू विक्रीचा अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असून, आपले कुटुंब हे पोटा पाण्यासाठी मुंबईला गेले असताना आपली जमीन शेजारील बाळू करे व त्याच्या कुटुंबाला वहीतीसाठी न देता दुसऱ्याला दिली.
अकोला : पातूर तालुक्यातील मळसूर येथील अवैद्य दारू विक्री करणाऱ्या आपल्याच भावकी मधील व्यक्तींनी राहत असलेल्या जागेच्या पार्श्वभूमीतून आपणास व आपल्या पती, मुलास मारहाण केली. गावातील नात्यातील असलेला बाळू करे व त्याचे भाऊ हे गावात अवैध दारू विक्रीचा अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असून, आपले कुटुंब हे पोटा पाण्यासाठी मुंबईला गेले असताना आपली जमीन शेजारील बाळू करे व त्याच्या कुटुंबाला वहीतीसाठी न देता दुसऱ्याला दिली. याचा वचपा बाळू करे याने देवकते कुटुंब गावी घरी परत आल्यावर काढून माझ्या घरावर जबरदस्तीने अतिक्रमण केले. या संदर्भात विचारणा केली असता मला व कुटुंबास मारहाण केली असल्याचे सौ.देवकते यांनी निवेदनात नमूद केले. हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री या संदर्भात तक्रार देण्यास चान्नी पोलिस ठाण्यात गेल्यावर आरोपींना अभय देत उलट आम्हा कुटुंबास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आरोपीसमोर धमकी दिली असल्याचे निवेदनात सौ. देवकते यांनी नमूद केले. हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच पोलिस तक्रार नोंदवित नसल्यामुळेच मी हे निवेदन देत असून, माझ्या कुटुंबास करे कुटुंब व त्याच्या अवैध दारू विक्रीस प्रोत्साहन देणाऱ्या चान्नी पोलिसांपासून धोका असून, मला या प्रकरणाची योग्य चौकशी करून न्याय देण्याची मागणी सौ.देवकते यांनी निवेदनात केली आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||