esakal | पोलिस बंदोबस्त; रुग्ण दगावला अन् नातेवाईकांनी केली रुग्णालयातच तोडफोड
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Police security; Relatives vandalized the hospital after the patient was stabbed

ऱामदास पेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाईकांनी तोडफोड केली.

पोलिस बंदोबस्त; रुग्ण दगावला अन् नातेवाईकांनी केली रुग्णालयातच तोडफोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : ऱामदास पेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाईकांनी तोडफोड केली.

त्यामुळे रुग्णालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र नंतर या प्रकरणात रुग्णालयाकडून कोणतीही तक्रार न दिल्याने व रामदार पेठ पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीने समेट घडवून आणला असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्चम महिन्यात

अकोला शहरातील रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात सांयकाळच्या सुमारास कारंजा येथील एक रुग्ण दगावला.

रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनावर योग्य उपाचार न केल्याचा आरोप लावून तोडफोड करण्यास सुरुवात केली. आयसीयु परिसरातील काचही फोडली.

हेही वाचा - बर्ड फ्ल्यूचा धोका; ३५० पक्षांचे नमुने निगेटिव्ह

रुग्णांच्या नातेवाईकांनी तोडफोड सुरू केल्याने हॉस्पिटल प्रशासनाकडून रामदास पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटना स्थळावर दाखल झाले. मात्र नंतर कोणताही तक्रार देण्यात आली नाही आणि प्रकरण आपसात मिटविण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार झाली नसल्याने पोलिसांना कारवाई करता आली नाही.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image