
महानगरपालिकेवर अग्निशमन विभागाची जबाबदारी आहे. असे असतानाही महानगरपालिकेत वरातीमागून घोडे नाचवले जात असल्याचे दिसून येते आहे. भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील जळीत कांडानंतर खळबळून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने अखेर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील २४ अग्निरोधक सिलिंडर बदलले.
अकोला ः महानगरपालिकेवर अग्निशमन विभागाची जबाबदारी आहे. असे असतानाही महानगरपालिकेत वरातीमागून घोडे नाचवले जात असल्याचे दिसून येते आहे. भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील जळीत कांडानंतर खळबळून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने अखेर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील २४ अग्निरोधक सिलिंडर बदलले.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालये, कार्यालयांमधील अग्निशमन यंत्रणा तपासणीचे आदेश दिले होते.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
ही जबाबदारी प्रामुख्याने जिल्हा प्रशासनासोबतच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागावरच आहे. मात्र मनपाच्या प्रशासकीय इमारतीतच कालबाह्य झालेली अग्निरोधक सिलिंडर होते.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
अखेर प्रशासनाने हे सिलंडर बदलण्याचा आदेश दिला. त्यानुसार गुरुवार, ता. २१ जानेवारीपासून अकोला महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सर्व व विभागांमधील अग्निरोधक सिलिंडर बदलण्यात आले.
हेही वाचा - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा
त्यात प्रामुख्याने दस्तऐवज असलेल्या विभागांचा समावेश आहे. याशिवाय महापौर, उपमहापौर कार्यालयासोबतच मुख्य सभागृह, स्थायी समिती सभागृह, आयुक्त व उपायुक्तांची दालणे व इतर विभाग प्रमुखांच्या दालनांचा समावेश आहे.
(संपादन - विवेक मेतकर)