
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गासाठी महापालिकेच्या मालकीची ३६ गुंठे जागारेल्वे विभागाने घेतली आहे. या जागेच्या मोबदल्यात रेल्वे विभाग महापालिकेकडे २ कोटी ८१ लाख रुपयाच्या महसुलाचा भरणा करणार आहे. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत भर पडणार आहे.
अकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गासाठी महापालिकेच्या मालकीची ३६ गुंठे जागारेल्वे विभागाने घेतली आहे. या जागेच्या मोबदल्यात रेल्वे विभाग महापालिकेकडे २ कोटी ८१ लाख रुपयाच्या महसुलाचा भरणा करणार आहे. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत भर पडणार आहे.
अकोला येथून पूर्णा -खंडवा रेल्वे मार्ग महापालिकेच्या डंम्पिग ग्राऊंड जवळून गेला आहे. पूर्वी हा मार्ग मिटरगेज होता. आता या मार्गाचे अकोटपर्यंत ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. ब्राॅडगेजसाठी रेल्वे विभागाला डम्पिंग ग्राऊंडवरील महापालिकेच्या मालकीची जागा घ्यावी लागली.
हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी
जागा खरेदी करण्याबाबतचे संपूर्ण सोपस्कार पार पडले आहेत. विभागाने जागेची मोजणी करून घेतली आहे. महापालिकेकडून रेल्वे विभागाला ३६ गुंठे जागा घ्यावी लागत आहे. या जागेचे रेडिरेक्नरनुसार दर रेल्वे विभागाला द्यावे लागणार आहेत.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
रेल्वे विभागाने खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून, लवकरच ही जागा रेल्वे विभागाच्या नावावर होवून जागेचा मोबदला दोन कोटी ८१ लाख रुपयाचा भरणा केला जाणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)