esakal | तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News RBI to provide training and financial strength to co-operative banks for industry

प्रथमच सहकारी बँकांच्या सहकार्याने राबविला जातोय उपक्रम; शनिवारी अकोल्यात कार्यशाळा, नवउद्योजकांना मिळणारा आर्थिक बळ.

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : उद्योग क्षेत्रात उतरल्यानंतर सर्वप्रथम येणारी अडचण म्हणजे आर्थिक गणितं जुळवणे. त्यासाठी बँकांचा माराव्या लागणाऱ्या फेऱ्या, तारण ठेवण्याची करावी लागणारी व्यवस्था आदी अडचणींमुळे अनेक तरूण उद्योग सुरू करण्याचा विचार सोडून देतात.

ही अडचण लक्षात घेता आता रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांनाही नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी सहभागी करून घेतले आहे. जिल्ह्यात अकोला अर्बन बँके आता नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य करणार आहे.


नवउद्योजक निर्मितीच्या उद्देशाने आर्थिक बळ देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. दी अकोला अर्बन को-ऑप. बँक लि. अकोला व केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी शनिवार, ता. १३ फेब्रुवारी रोजी अकोल्यात नवउद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद दशपुते यांनी दिली.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

ही कार्यशाळा शनिवारी दुपारी २ वाजता गोरक्षण मार्गावरील शुभमंगल सभागृहात होणार आहे. उद्‍घाटन आमदार रामदास आंबटकर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री बच्चू कडू, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमादार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारचे संचालक प्रमोद पार्लेवार राहतील.

हेही वाचा -  जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

रोजगारभिमुख नागरिक घडविण्यावर भर
एमएसएमई योजनेअंतर्गत छोटे व्यवसायिक, फळ आणि व्हेजिटेबल प्रक्रिया, स्टोन कटिंग पोलिसिंग, पापड उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट, सोने चांदी दागिने उत्पादन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ऑफिस प्रिंटिंग अँड बुक बाइंडिंग, जनरेटर उत्पादन, मशिनरी स्पेअर पार्ट, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफी, मोटर रिवाइंडिंग, फॅब्रिक उत्पादन, सलून, सजावट ब्लब उत्पादन, रुरल ट्रान्सपोर्ट सर्विसेस, सिल्क साडी उत्पादन, चटई बनविणे, ग्रामीण तेल घाणी उद्योग, काटेरी तारांचे उत्पादन आदी रोजगाराभिमुख उद्योग राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा - पहिलाच प्रयोग; अकोल्यात साकारतेय चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाणे

रोगारनिर्मितीबाबत मार्गदर्शन
या उद्योजगता कार्यशाळेत विविध विषयावर सांगोपांग मार्गदर्शन करण्यात येणार रोजगार निर्मितीबाबत कार्यशाळा लाभदायक ठरणा आहे. मानव संसाधन निर्मातीवर भर देणारा हा उपक्रम असल्याने नागरिकांनी बँकेच्या वतीने साकारलेल्या या उद्योजकता कार्यशाळेत व ग्राहक मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा उपक्रम बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, सचिव हरीशभाई लाखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात साकार करण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top