esakal | शिवसेनेची याचिका, सत्ताधारी-विरोधकांचे निर्णयाकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News  Shiv Sena Akola Zilla Parishad Deprived Bahujan Aghadi Resolution

सत्ताधारी व विरोधकांच्या वकिलांनी बाजू मांडल्यामुळे प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, विभागीय आयुक्तांनी निर्णय आरक्षित ठेवला आहे.

शिवसेनेची याचिका, सत्ताधारी-विरोधकांचे निर्णयाकडे लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : जिल्हा परिषदेच्या १० डिसेंबर २०२० रोजी पार पडलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अध्यक्षांच्या परवानगीने वेळेच्या १८ विषयांना मंजुरी दिली होती. परंतु शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आलेले ५ ठराव फेटाळून लावण्यात लावले होते. त्यामुळे या प्रकरणी विरोधक शिवसेनेने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे.

दरम्यान सदर प्रकरणाची मंगळवारी (ता. ९) विभागीय आयुक्तांच्या समोर सुनावणी झाली. सत्ताधारी व विरोधकांच्या वकिलांनी बाजू मांडल्यामुळे प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, विभागीय आयुक्तांनी निर्णय आरक्षित ठेवला आहे.

हेही वाचा -  भाजपचे आमदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेने केला ‘गेम’

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १० डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेत शिवसेनेच्या वतीने बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील ६९ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्याचा ठराव मांडण्यात आला. परंतु सदर ठरावाला तांत्रितदृष्ट्‍या अयोग्य ठरवत सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले.

हेही वाचा - गुपचूप हलवले जात होते शासकीय कार्यालय, भाजप, प्रहारचे कार्यकर्त्यांनी वाचा काय केले

याव्यतिरीक्त सभेत शिवसेनेने विषय क्रमांक १२, १६, २५ व ३२ मांडण्यात आले होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी सदर ठराव पारित न करता ते फेटाळून लावले. त्यामुळे शिवसेनेने वेळेवरच्या विषयांवरून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वसाधारण सभेचे सचिव यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. परिणामी विभागीय आयुक्तांनी वेळेवरच्या विषयांना अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती प्रदान केली असून याविषयाची सुनावणी ९ फेब्रवारी रोजी झाली. परंतु विभागीय आयुक्तांनी निर्णय आरक्षित ठेवला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल

वेळेवरच्या विषयांवर घेतला होता आक्षेप
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी १८ विषय वेळेवर मांडले. सदर विषयांवर शिवसेना आयुक्तांकडे धाव घेतली आहे. त्यात पाेपटखेड-मलकापर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी निविदा स्वीकृत करणे, दुधाळ जनावर वाटप याेजनेला तांत्रिक मंजुरी देणे, लामकाणी येथील पाणी साठवण टाकी पाडणे, पाटी येथील साठवण टाकी पाडण्यास मंजुरी देणे, बटवाडी, भरतपूर येथील ग्रा.पंची इमारत पाडणे, नागद सागद व दगडखेड येथील पाण्याची टाकळी पाडणे व इतर विषयांचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top