esakal | महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News Exploitation by a woman child takes extreme measures

नीलेश विरूद्ध एका महिलेने बलात्काराचा रिपोर्ट दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्या कानावर ही बाब येताच तो घाबरलेला होता. संबंधित महिला ही नीलेशला नेहमी पैशाची मागणी करून त्याला ब्लॅकमेल करीत होती. त्याने पैसे न दिल्यानेच त्याच्या विरूद्ध रिपोर्ट दिला आहे.

महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: लैंगिक शोषण हे लिंगभेदाच्या पलीकडचं असतं. स्त्री किंवा पुरुष कुणाचंही लैंगिक शोषण होऊ शकतं. वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर 'मी टू' हा हॅशटॅग वापरत अनेक महिलांनी त्यांचे अनुभव शेअर केले. पण, समाजात असे अनेक पुरूष आहेत ज्यांना लौंगिक शोषणाला सामोरं जावं लागलं आहे.

असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस आला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आपल्या भावाने आत्महत्या केली, अशी तक्रार बाळापूर ठाण्यात दाखल केली आहे.

हेही वाचा - नीमा अरोरा  महानगरपालिकेच्या पहिला महिला आयएएस आयुक्त

पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बाळापूर तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय नीलेश महादेव काळींगे या युवकाविरुद्ध एका महिलेने लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली होती.


 युवकाविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर युवकाने दुसऱ्याच दिवशी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर नीलेशचा भाऊ गणेश यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. 

हेही वाचा - आईवडीलांना सांभाळा, अन्यथा ३० टक्के पगार वळविणार!


तक्रारीत म्हटले की, ‘ नीलेश विरूद्ध एका महिलेने बलात्काराचा रिपोर्ट दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्या कानावर ही बाब येताच तो घाबरलेला होता. संबंधित महिला ही नीलेशला नेहमी पैशाची मागणी करून त्याला ब्लॅकमेल करीत होती. त्याने पैसे न दिल्यानेच त्याच्या विरूद्ध रिपोर्ट दिला आहे.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

तिच्या त्रासाला कंटाळुनच माझ्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या मृत्यूस संबंधित महिलाच जबाबदार आहे’, अशा तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

वाचा - 21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच 

वाचा -  बातमी वाऱ्यासारखी पसरली; ऐंशी फुट खोल विहिरीत घडलं काय?

वाचा - अफलातून प्रयोग; आता रस्त्यावर धावणारपाण्यावर चालणारी मोटसरायकल

loading image
go to top