
शिवसेनेचे खा तथा ग्रामसमितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी आपल्या मतदारसंघासह मूळगावी देखील शिवसेनेचे वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे.
मेहकर (जि.बुलडाणा) : शिवसेनेचे खा तथा ग्रामसमितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी आपल्या मतदारसंघासह मूळगावी देखील शिवसेनेचे वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे.
मेहकर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करण्याबाबत खासदार जाधव व आमदार संजय रायमूलकर यांनी पुढाकार घेतला होता.
हेही वाचा - धक्कादायक! मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला
त्याप्रमाणे खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील आपल्या मुळगावतील मादणी येथील निवडणूक अविरोध करा, तसेच युवकांनी पुढाकार घ्यावा असे सुचवले होते. तरी गावातील काहींनी त्यांचे न ऐकता आपापले पॅनल उभे केले.
हेही वाचा - Gram Panchayat Result : आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल
आज निकाल जाहीर झाल्यावर खासदारजाधव यांच्या शिवसेना पॅनल चे 9 पैकी 7 ग्राम पंचायत सदस्य निवडून आले तर इतर पॅनल चे 2 असे सदस्य निवडणून आले आहेत. सर्व सद्सयचे स्वागत युवासेना जिल्हा अधिकारी ऋषिकेश जाधव व शिवसेना पदाधिकारयांनी शिवसेना कार्यालयात केले
(संपादन - विवेक मेतकर)