esakal | Gram Panchayat Result : आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- MLA Amol Mitkaris Kutasa village won 16 candidates in Gram Panchayat elections

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले.  आता खऱ्या अर्थाने रंगत वाढली असून वेगवेगळे निकाल समोर येत आहेत.

Gram Panchayat Result : आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला:  जिल्ह्यात संजय धोत्रे यांच्या पळसोबडे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आणखी एका गावाच्या निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा गावातील. कुटासा गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.

कुटासा हे गाव जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांचं गाव आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसनेते प्रा. उदय देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती विजयसिंह सोळंके यांचं हे गाव.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले.  आता खऱ्या अर्थाने रंगत वाढली असून वेगवेगळे निकाल समोर येत आहेत.

हेही वाचा - पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी आधी स्वतःला लस टोचून घ्यावी, त्यानंतर मी लस टाेचून घेईल- ॲड. प्रकाश आंबेडकर

गावात एकूण 46 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. गावात इतर तीन पॅनलही रिंगणात आहे. यात काँग्रेसचा देशमुख गट आणि भाजपच्या विजयसिंह सोळंके यांची गावात युती आहे. तर वंचित बहूजन आघाडीचं स्वतंत्र पॅनल उभं आहे. सोबतच युवक काँग्रेसचा गट आणि शिवसेनेच्या संतोष जगताप यांच्या पॅनल रिंगणात आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार यांच्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्वराज्य पॅनलचे एकून सोळा उमेदवार आपले नशिब आजमावत होते. मात्र, नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार आमदार मिटकरी यामच्या गावातील 13 पैकी 10 जागा राखल्या असल्याची माहिती समोर येत आहे. 

हेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन

 तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीने निवडणूकीचे वातावरण बदलवून टाकले. काहींनी तर आपलाच विजय निश्चित असल्याचे घोषित करून टाकले तर काही उमेदवारांनी सोशल मीडियावर आपलाच विजय नक्की असल्याचे वृत्त झळकविले आहे. 

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकींमध्ये नेहमीच चुरस पहायला मिळते. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूका शांततेत पार पडल्या आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत सर्वच निकाल समोर येणार आहे. 

(संपादन - विवेक मेतकर)