राज्य शासनाने मराठा समाजाच्या तोंडाला पुसली पानं, वाचा कुणी केली टिका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर मराठा समाजातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण घेवू मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली असल्याची टिका अखिल भारतीय मराठा महासंघाचे विनायकराव पवार यांनी केली आहे.
 

अकोला : राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर मराठा समाजातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण घेवू मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली असल्याची टिका अखिल भारतीय मराठा महासंघाचे विनायकराव पवार यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचं प्रकरण अंतिम सुनावणीसाठी जानेवारीत होऊ घातलं असतांना आणि निकाल अनुकूल येईल या अपेक्षेत मराठा समाज असताना राज्य शासनाने ईडब्ल्यूएस आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. दुर्दैवाने निकाल विरोधात गेलाच असता तर ईडब्ल्यूएसचा पर्याय मराठा समाजासमोर तसाही होताच. राज्य शासनाने घाई केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. तसंही शासन गंभीर नव्हतंच,

हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
या निर्णयानं मराठा समाजाच्या तोंडाला एकप्रकारे पानं पुसल्या गेली. मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून, आता समाजामधील सहनशीलतेचा अधिक अंत न पाहता, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा घेतलेला निर्णय राज्य शासनाने त्वरित रद्द करावा, अशी आमची मागणी, विनायकराव पवार यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola marathi news state government maratha reservation