esakal | अलास्का, युरोप, अफ्रिकेमधुन आले विदेशी पाहुणे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Exotic guest birds came from Alaska, Europe, Africa

थंडीचा जोर सुरू होताच पाणथळ प्रदेश, झाडेझुडपे, जंगल असलेल्या भागात विविध रंगीबेरंगी विदेशी पाहुण्याचे आगमण सुरू होते. अकोला जिल्ह्यात कापशी, महान, कुंभारी, दगडपारवा आदी ठिकाणच्या जलसाठ्यांवर २० विविध विदेशी स्थालांतरीत पक्षी आढळून आले आहेत.

अलास्का, युरोप, अफ्रिकेमधुन आले विदेशी पाहुणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : थंडीचा जोर सुरू होताच पाणथळ प्रदेश, झाडेझुडपे, जंगल असलेल्या भागात विविध रंगीबेरंगी विदेशी पाहुण्याचे आगमण सुरू होते. अकोला जिल्ह्यात कापशी, महान, कुंभारी, दगडपारवा आदी ठिकाणच्या जलसाठ्यांवर २० विविध विदेशी स्थालांतरीत पक्षी आढळून आले आहेत.


पक्षी स्थलांतर करण्याचे प्रमुख कारण म्हणजे ऋतुमानानुसार अधिवासात होणारा बदल. स्थानिक परिस्थिती प्रतिकूल होऊ लागली की अन्नाचा तुटवडा जाणवतो. अशा वेळी पक्षी जेथे मुबलक अन्न प्राप्त होऊ शकते अशा ठिकाणी जातात.

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. अकोल्या जिल्ह्यात २०२० मध्ये २० पेक्षा अधिक विदेश स्थलांतरीत पक्षांची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने थापट्या, नकटा, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल, तरंग, चक्रवाक बदके तसेच पट्टकादंब गूज आदींचा समावेश आहे.

याशिवाय चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव, उचाट, सोनचिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षी आढळून आले आहेत. गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हारिण, तीसा, श्येन कुकरी, खरुची हे शिकारी पक्षीही बघावयास मिळत असल्याची माहिती पक्षी संशोधक लक्षमीशंकर यादव यांनी दिली.

हेही वाचा -  हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

दोन मार्गाने स्थलांतर
भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला, पाणथळीच्या पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात. पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा इशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

चार महिन्यांपासून सुरू आहे निरीक्षण
हिवाळ्याची चाहूल झाल्यानंतर अकोला जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात होते. अकोला जिल्ह्यामध्ये या वर्षी स्थलांतरीत पक्षी येण्याच्या पूर्वीपासून म्हणजे चार महिन्यांपासून स्थालांतरीत पक्ष्यांची नोंद पक्षी संशोधक लक्षमीशंकर यादव घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image