इमारतींची कामे होतील मुदतीत पूर्ण , पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली पाहणी

Akola Marathi News Work on buildings under construction will be completed on time, Guardian Minister Bachchu Kadu inspected
Akola Marathi News Work on buildings under construction will be completed on time, Guardian Minister Bachchu Kadu inspected

अकोला :  जिल्ह्यातील सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल, सामाजिक न्याय भवन, पोलिस वसाहत, पोलिस आयुक्तालय व सांस्कृतिक भवनाचे निर्माणाधीन बांधकामांची राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी निर्माणाधीन इमारतीची कामे मुदतीच्या आत तातडीने पूर्ण करा, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

शहरामध्ये विविध प्रकारची विकास कामे करण्यात येत आहेत. परंतु त्यांची गती कासव आहे. संबंधित कामांची प्रगती व गुणवत्तेची पालकमंत्री बच्चू कडू यांनी दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर असताना पाहणी केली.


सुपर स्पेशलिटीच्या यंत्रसामुग्रीची पाहणी
पालकमंत्र्यांनी सुपर स्पेशलिटी हॉस्पीटला भेट देवून हॉस्पीटलचे बांधकाम व वैद्यकीय यंत्रसामुग्रीची पाहणी केली. इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा व उपचाराकरीता आवश्यक यंत्राची स्थापना करून सामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधेचा लाभ लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील व बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना उपाचाऱ्याकरीता सुपर स्पेशलिटी हॉस्पीटलचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून दुर्धर व मोठे आजाराचे उपचार करणे सोईचे होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पोलिस वसाहतीच्या कामाचे समाधान
पोलिस वसाहत व पोलिस आयुक्तालयाच्या निर्माणधीन बांधकामाची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना निवारा मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले. तसेच सामाजिक न्याय भवनाचे कामाची पाहणी करुन विहित मुदतीच्या आत व दर्जेदार भवनाचे निर्माण कार्य पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. जिल्ह्यातील सांस्कृतिक भवनाचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, मनपाचे आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए.ए. गणोरकर आदि अधिकारी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com