
Akola : ‘मेरा राशन मेरा अधिकार’ माेहीम
अकोला : मुव्हमेंट फाॅर पीस ॲड जस्टीसतर्फे (एमपीजे) मेरा राशन मेरा अधिकार माेहीम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माेहम्मंद सिराज यांनी दिली. शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणालीतून सर्वच पात्र शिधापत्रिकाधारांना धान्य द्यावे, अशी मागणी एमपीजेने केली.
हेही वाचा: Akola : आ.प्रकाश भारसाकळेकडून पूर परिस्थितीची पाहणी
राष्ट्रीय अन्न सुरक्षेनअंतर्गत लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्यात येते. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना परवाना देण्यात येताे. मात्र, काही जण लाभार्थ्यांना त्यांच्या वाट्याचे पूर्ण धान्य देत नाहीत, असा आराेप एमपीजने केला. ई-पाॅस मशिनद्वारे धान्य देण्यात येते. भाेळ्या शिधापत्रिकाधारकांचा अंगठा लावून कमी धान्य देण्यात येते आणि पैसे मात्र पूर्ण घेण्यात येतात.
हेही वाचा: Akola : भाऊसाहेबांच्या परंपरेनुसार चालण्याचे वचन देतो : हर्षवर्धन देशमुख
नियमानुसार तक्रारीसाठी टाेल फ्री नंबर, ई-मेल, संकेतस्थळ, संबंधित निरीक्षकाचा नंबर हा बाेर्डावर नमूद करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक दुकानांवर हा बाेर्ड नसताे. याबाबत अनेकजण तक्रारीही करतात. मात्र, त्यावर तातडीने सुनावणी हाेत नाही. त्यामुळे आता एमपीजेतर्फे ‘मेरा राशन मेरा अधिकार’ ही माेहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अफरस उस्मानी, माे. आतिक उर्र रहेमान, हुसेन खान आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.