अकोला : बाळापुरात महावितरणने २१ वीज चोऱ्या पकडल्या

वीज चोरांकडून साडेपाच लाख रुपयांच्या वीज देयकासह १२ लाख रुपयांचा दंड
Akola MSEB 21 power theft
Akola MSEB 21 power theftsakal

अकोला : वीज चोरांच्या विरोधात महावितरणने आक्रमक होत बाळापूर तालुक्यात मागील १५ दिवसात २१ ठिकाणी वीज चोऱ्या पकडल्या. या वीज चोरांकडून साडेपाच लाख रुपयांच्या वीज देयकासह १२ लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बाळापूर उपविभागात येणाऱ्या अडोशी, जोगलखेड, बाळापूर शहर, मानकी, पारस, निमखेडा, बाटवाडी, व्याळा या ठिकाणी वीज मीटरमध्ये अनधिकृतपणे छेडछाड करून वीज वापर करण्याऱ्या फुकट्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आला. मानकी गावात सहा, पारसमध्ये तीन, आडोशी आणि बाळापूरमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी महावितरणकडून कारवाई करण्यात आली.

वीजेची मागणी वाढल्याने वीज यंत्रणेवर भर वाढला असून अनधिकृत आकडे टाकून आणि वीज मीटरमध्ये छेडछाड करून काही जण वीज चोरी करीत असल्याने काही ठिकाणी महावितरणची उपकरणे खराब झाल्याची बाब निदर्शनास आल्यावर महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली. या अगोदर मूर्तिजापूर, बोरगाव मंजू या ठिकाणी पण करण्यात आली होती. वीज चोरी करणाऱ्या वीज ग्राहकांनी महावितरणची ४७ हजार ५४६ युनिट वीज फुकटात वापरल्याचे आढळून आले.

आगामी काळात देखील महावितरणकडून अनधिकृत पाने वीज वापर करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात याच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे. वीज चोरी करणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य असून जर वीज चोरीचा गुन्हा सिद्ध झाल्यास कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद कायदायत करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com