अकाेला : ग्रामीण भागातील बत्ती गुल; शहरात विजेचा लपंडाव

चिखली सब स्टेशनवरील गावे अंधारात
Akola MSEB Power outages in village Chikhali
Akola MSEB Power outages in village ChikhaliSakal

रिसोड : चिखली सब स्टेशनवरील गावठाणमधील एक फिडर जळाल्यामुळे तसेच वाऱ्यामुळे काही वृक्ष तारावर पडल्याने चिखली सब स्टेशनवरील जवळपास बारा गावे शुक्रवार व शनिवारच्या रात्री अंधारात होती तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व कामे न केल्यामुळे विजेचा हा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे रिसोड शहरात सुद्धा मागील दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.

मान्सूनपूर्व कामे न केल्यामुळे दरवर्षी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विजेच्या समस्या निर्माण होतात. शहरात मागील दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे तर ग्रामीण भागात मात्र विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रात्रभर लाईन नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रोहित्र जळणे वाऱ्यामुळे तारावर वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा बंद होणे हे पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी नित्याचेच झाले आहे.

तरीही वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व कामे केल्या जात नाहीत. शुक्रवार दिनांक १० जूनच्या रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत चिखली फिडरवरील जवळपास बारा गावांना वीज नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या कालावधीत लाईनमनला मात्र मोठी धावपळ होऊन त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. ग्रामीण भागातही प्रत्येक घरी बोरवेल आहेत वीज नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच मोबाईल बंद पडले होते. त्यामुळे इतरांशी संपर्क तुटला होता. रिसोड शहरात सुद्धा मागील दोन दिवसापासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com