अकोला : महानगरपालिकेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा १४५६.८३ कोटींचे अंदाजपत्रक मंगळवारी (ता.२५) प्रशासक तथा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी सादर केले. पुढील आर्थिक वर्षात १४४५.९१ कोटी खर्च अपेक्षित धरून, १०.९२ कोटींच्या शिल्लकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. दैनंदिन नागरी सेवा, पर्यावरण, शिक्षण, वाहतूक, दिव्यांगांसाठी सुविधा आणि तांत्रिक सुधारणा यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. आरोग्य सुविधांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.