अकोला : प्रभाग रचना प्रसिद्ध; ३० प्रभागात ९१ सदस्य

२९ प्रभाग तीन सदस्यीय; तिसाव्‍या प्रभागात चार सदस्य
Akola Municipal Corporation 91 members in 30 ward
Akola Municipal Corporation 91 members in 30 wardsakal
Updated on

अकोला : महानगरपालिकेची बहुप्रतीक्षीत प्रारुप प्रभाग रचना मंगळवारी, ता. १ फेब्रुवारीला मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी प्रसिद्ध केली. प्रभाग रचनेबाबत ता.१४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे गेले कित्येक दिवसांपासून प्रभाग रचनेबाबत असलेली उत्सुकता संपली आहे. अकोला मनपात ३० प्रभाग असून, त्यातील २९ प्रभाग तीन सदस्यीय तर तिसावा प्रभाग चार सदस्यीय आहे.

Akola Municipal Corporation 91 members in 30 ward
संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

यापूर्वी चार सदस्यी प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्यात आली होती. यावेळीही बहुसदस्यी प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली असली तरी प्रभागातील सदस्यांची संख्या तीन करण्यात आली आहे. त्यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी प्रभाग रचनेबाबत उत्सुकता अधिक होती. ही उत्सुकता मंगळवारी संपली. अकोला मनपात आता ३० प्रभागातून ९१ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत २० प्रभागातून ८० सदस्य निवडले होते.प्रभागातील राजकीय गणित मांडण्यात इच्छुक व्यस्त प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि नकाशे प्राप्त झाल्याने आता प्रभागाच्या रचनेवरून राजकीय गणित मांडण्यास सुरुवात झाली आहे. त्यासोबतच प्रभागात जोडण्यात आलेल्या परिसराबाबतही चर्चा घडून येत आहे. ता. १४ फेब्रुवारी पर्यंत या आराखड्याबाबत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार असल्याने त्याचीही तयारी इच्छुकांकडूनकेली जात आहे.

प्रभाग क्रमांक ३० मध्ये चार सदस्य

अकोला मनपाची सदस्य संख्या ८० वरून ९१ झाली आहे. प्रत्येक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. त्यामुळे २९ प्रभागात प्रत्येकी तीन सदस्य राहणार असून, शेवटचा म्हणजे प्रभाग क्रमांक तीनमधून चार सदस्य निवडून दिले जातील. त्यामुळे अकोला मनपातील हा प्रभाग सर्वात मोठा प्रभाग राहणार आहे.

अशी असणार प्रक्रिया

  • १ फेब्रुवारी : प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

  •  १४ फेब्रुवारी : १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करता येणार

  •  १६ फेब्रुवारी : निवडणूक आयोगाकडे हरकतींचा अहवाल सादर करणार

  •  २६ फेब्रुवारी : हरकतींवर सुनावणी होणार

  •  २ मार्च : निवडणूक आयोगाकडे अंतिम अहवाल

  •  ४ मार्च : अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार

  •  ७ मार्च : प्रारूप मतदार यादीची प्रक्रिया सुरू

Akola Municipal Corporation 91 members in 30 ward
केंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी केली रद्द; कॅगच्या अहवालानंतर संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

प्रभाग रचना बघण्यासाठी उत्सुकता

महानगरपालिकेकडून नवीन प्रभाग रचनेच्या आराखड्याला प्रसिद्धी दिल्यानंतर राजकारणी, पदाधिकारी, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह नागरिकांमध्ये सुद्धा नवीन प्रभाग रचनेचा आराखडा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता दाखविली. प्रभाग रचनेचा आराखडा मनपाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याने सकाळपासूनच आराखडा सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायलर झाला होता.

आता उत्सुकता आरक्षणाची

प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाला असला तरी प्रभागाच्या आरक्षण सोडतीसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.प्रभागनिहाय उमेदवारांचे आरक्षण हे प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काढले जाईल, असे संकेत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर आरक्षण सोडत अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आरक्षणाबाबतची उत्सुकता तोपर्यंत ताणली जाणार आहे.

असे आहेत प्रभाग

  • प्रभाग क्र. १ ः लोकसंख्या १६ हजार ४३८, अ.जा. ८१५, अ.ज. ५३ ः शिलोडा, नायगाव गावठाण, फरिदनगर, नगिना मस्जिद, संजय गांधी नगर

  • प्रभाग क्र. २ ः लोकसंख्या १५ हजार५९७ , अ.जा. तीन हजार ८२, अ.ज. ३०५ ः हाजीनगर, अकबर प्लॉट, परदेशीपुरा, मोचीपुरा, साधना चौक, मच्छी मार्केट, लाडीस फैल, सोळाशे प्लॉट, राजीव गांधीनगर, अशोक नगरचा काही भाग

  • प्रभाग क्र. ३ ः लोकसंख्या १५ हजार ५३३, अ.जा. तीन हजार ७४२, अ.ज. ७९ ः पुरपीडित कॉलनी, इंदिरानगर, रमाबाई आंबेडकरवाडी, सोळाशे प्लॉटचा भाग, अशोक नगरचा काही भाग.

  • प्रभाग क्र. ४ ः लोकसंख्या १७ हजार ९१९, अ.जा. आठ हजार ८२३, अ.ज. ५२९ ः खरब बु. उमरखेड, उमरी प्र. अकोला, न्यू तापडियानगर, बापूनगर, शंकर नगर, चिखलपुरा, रेल्वे क्वॉटर.

  • प्रभाग क्र. ५ ः लोकसंख्या ः २० हजार २६२, अ.जा. तीन हजार १००, अ.ज. ४८० ः उमरी प्र. बाळापूर

Akola Municipal Corporation 91 members in 30 ward
TRAI कडून मार्चमध्ये 5G साठी शिफारस; 2022 मध्ये सुरु होईल सेवा
  • प्रभाग क्र. ६ ः लोकसंख्या १६ हजार १३१, अ.जा. चार हजार ७०३, अ.ज.४७७ ः शिवर, गुडधी, कृषीनगरचा काही भाग

  • प्रभाग क्र. ७ ः लोकसंख्या ः १७ हजार ५०४, अ.जा. दोन हजार ४८१, अ.ज. ३०५ ः अष्टवविनायक नगर, वृंदावननगर, दत्तवाडी, स्टेट बँक कॉलनी, लहान उमरी, खेडकरनगर, मोरेश्वर कॉलनी, गजाननपेठ, राऊतवाडी, सावंतवाडी.

  • प्रभाग क्र. ८ ः लोकसंख्या ः १८ हजार ६३९, अ.जा. दोन हजार १८१, अ.ज. ५६४ ः जठारपेठ, गड्डम प्लॉट, प्रसाद कॉलनी, बिर्ला कॉलनी, ज्योतीनगर, निबंधे प्लॉट, गुप्तेमार्ग, महाजनी प्लॉट, तापडीयानगर.

  • प्रभाग क्र. ९ ः लोकसंख्या ः १६ हजार २७२, अ.जा. दोन हजार ८३२, अ.ज. ५८३ ः मराठानगर, रामदासपेठ, भागवतवाडी, गंगाधर प्लॉट, हनुमानबस्ती, मातानगर, देशमुख फैल, शेलार फैल, लक्ष्मी ऑईल कंपाऊंड.

  • प्रभाग क्र. १० ः लोकसंख्या ः १९ हजार ४२१, अ.जा. पाच हजार ९४४, अ.ज. ४५५, तारफैल, मोहता मिल चाळ, उत्तमचंद प्लॉट, विजयनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, माळीपुरा, जंगममठ, गवळीपुरा, मणकर्णा प्लॉट, जाम मोहल्ला, फिरदोस कॉलनीचा काही भाग.

  • प्रभाग क्र. ११ ः लोकसंख्या ः १६ हजार ३३७, अ.जा. ४९१, अ.ज. १३२ ः ज्ञानेश्वरनगर, वानखडेनगर, जोगळेकर प्लॉट, साईनगर, शरीफनगर, समता विद्यालयाचा परिसर, सैलानीनगर, भगतवाडी, नागेवाडी, आरपीटीएस.

  • प्रभाग क्र. १२ ः लोकसंख्या १७ हजार ८८८, अ.जा. दोन हजार ८८८, अ.ज. ३६३ ः डाबकी, लुंबिनीनगर, तपलाबाद, अक्कलकोट, कसबे अकोला, गजानननगर, आश्रयनगर, लक्ष्मीनगर, मेहरेनगर, इन्सपेक्टरनगर, सालासारबालाजी मंदिर परिसर.

Akola Municipal Corporation 91 members in 30 ward
2022 मध्ये दिसणार 5G चा दम! 'या' टेलिकॉम शेअर्समधून मिळेल बंपर परतावा
  • प्रभाग क्र. १३ ः लोकसंख्या ः१९ हजार ४०१, अ.जा. १८८०, अ.ज. ४६८ ः गोडबोले प्लॉट, रेणुकानगर, चिंतामणीनगर, सोपीनाथ, भारती प्लॉट, पार्वतीनगर, भिरडवाडी, वाल्मिकीनगर, रमेशनगर, गणेशनगर, इंदिरा कॉलनी, शिवनगर.

  • प्रभाग क्र. १४ ः लोकसंख्या ः १८ हजार ४८, अ.जा. पाच हजार ८३, अ.ज. ६१ ः भिमनगर, शांतीनगर, चहाचा कारखाना परिसर, ताजनगर, खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मीनगर.

  • प्रभाग क्र. १५ ः लोकसंख्या ः १७ हजार ४५१, अ.जा. ३८२, अ.ज. ७३ ः काळामारोती मंदिर परिसर, अगरवेस, जयहिंद चौक, गणपती गल्ली, मुंगसाजी महाराज मंदिर परिसर, शिवाजीनगर, शिवचरणपेठ, खिडकीपुरा, कोमटीपुरा.

  • प्रभाग क्र. १६ ः लोकसंख्या ः १६ हजार ३०६, अ.जा. ३९९, अ.ज. १५९ ः नाजूकनगर, गोरक्षण झोपडपट्टी, फिरदोस कॉलनीचा काही भाग, लहरिया प्लॉट, सायली जीन, सावतराम चाळ, रिगल टॉकीज परिसर, शालीनी टॉकीज परिसर.

  • प्रभाग क्र. १७ ः लोकसंख्या ः १७ हजार ८७२, अ.जा. १६५, अ.ज. १४ ः काला चबुतरा, मोहम्मद अली रोड, ताजनापेठ, पिंजारी गल्ली, मोमीनपुरा, तेलीपुरा, ईराणी झोपडपट्टी, फतेचौक, खारी बावडी.

  • प्रभाग क्र. १८ ः लोकसंख्या १६ हजार ८४४, अ.जा. दोन हजार ६६८, अ.ज. २९३ ः रतनलाल प्लॉट, रणपिसेनगर, पत्रकार कॉलनी, रामनगर, महसूल कॉलनी, आंबेडकरनगर, रुख्मीनीनगर, श्रावगी प्लॉट'', भागवत प्लॉट, संगवीवाडी, चवरे प्लॉट.

  • प्रभाग क्र. १९ ः लोकसंख्या ः १८ हजार ८८३, अ.जा. पाच हजार ३९७, अ.ज. ३२२ ः कृषीनगरचा काही भाग, जवाहरनगर, गोकुळ कॉलनी, सुधीर कॉलनी, मुकुंदनगर, शास्त्रीनगर, अमानखॉं प्लॉट, तोष्णीवाल लेआऊ, लाला लजपतराय सोसायटी.

  • प्रभाग क्र. २० ः लोकसंख्या ः १६ हजार ४२, अ.जा. पाच हजार ९४०, अ.ज. १५३ ः शिवणी, मलकापूरचा काही भाग.

  • प्रभाग क्र. २१ ः लोकसंख्या ः १६ हजार १८२, अ.जा. एक हजार ५२, अ.ज. ४१७ ः केशवनगर, वर्धमाननगर, रविनगर, माधवनगर, विद्युत कॉलनी, आझाद कॉलनी, कपिलवस्तू नगर.

  • प्रभाग क्र. २२ ः लोकसंख्या ः १९ हजार ५०६, अ.जा. दोन हजार २४७, अ.ज. ३९४ ः आदर्श कॉलनी, नगरपरिषद कॉलनी, सहकारनगर, किर्तीनगर, रामी हेरिटेज, विद्यानगर, काँग्रेसनगर, व्हीएचबी कॉलनी, युसुफअलीखदान, दत्तकॉलनी, हिराबाई प्लॉट, संभाजीनगर, विजय हाऊसिंग कॉलनी.

  • प्रभाग क्र. २३ ः लोकसंख्या ः १९ हजार ११८, अ.जा. तीन हजार १११, अ.ज. ३९५ ः सिंधी कॅम्प पक्की खोली, सिंधी कॅम्प कच्ची खोली, कैलास टेकडी, निमवाडी.

  • प्रभाग क्र. २४ ः लोकसंख्या ः १७ हजार १७४, अ.जा. एक हजार ४८५, अ.ज. ७९५ ः खोलेश्वर, रजपुतपुरा, राधाकिसन प्लॉट, राधेनगर, मंगळवारा, अनिकट पोलिस लाईन, नवरंग सोसायटी, जुना आळशी प्लॉट, नवीन आळशी प्लॉट.

  • प्रभाग क्र. २५ ः लोकसंख्या ः १६ हजार ८२८, अ.जा. तीन हजार १०५, अ.ज. ६९७ ः हरीहरपेठ, देशपांडे प्लॉट, जयरामसिंग प्लॉट, गाडगेनगर, भोईपुरा, महाकालीनगर, लोकमान्यनगर, भाग्योदयनगर.

  • प्रभाग क्र. २६ ः लोकसंख्या ः १७ हजार ७०७, अ.जा. ६४०, अ.ज. ५६० ः शिवसेना वसाहत भाग, सोनटक्के प्लॉट, हमजा प्लॉटचा काही भाग.

  • प्रभाग क्र. २७ ः लोकसंख्या ः १९ हजार ३२१, अ.जा. पाच हजार २११, अ.ज. २४५ ः सोमठाणा, अकोली खुर्द, कमला नेहरुनगर, सिद्धार्थवाडी, यशवंतनगर, गंगानगर, बोहरा कॉलनी, तथागतनगर, शिवसेना वसाहतचा काही भाग, हमजा प्लॉट भाग, मोडकेवाडी.

  • प्रभाग क्र. २८ ः लोकसंख्या १८ हजार २२८, अ.जा. दोन हजार ६५३, अ.ज. ४०१ ः शास्त्रीनगर, अब्दुल्ला कॉलनी, महात्माफुलेनगरचा भाग, हैदरपुरा, जेतवनगर, खोकेवाली चाळ, सरकारी गोडावून मागील भाग.

  • प्रभाग क्र. २९ ः लोकसंख्या ः १८ हजार ७४९, अ.जा. दोन हजार ४६३, अ.ज. ८२५ ः कौलखेड गावठाण, बलोदे लेआऊट, बाजोरियानगरी, आरोग्य नगर, उन्नतीनगर, लहरियानगर, बंजारानगर, आनंदनगर, ख्रिश्चिन कॉलनी.

  • प्रभाग क्र. ३० ः लोकसंख्या ः २४ हजार २५९, अ.जा. पाच हजार ७७, अ.ज. ९७४ ः शिवापूर, खडकी, मलकापूर गावठाण, कोठारी वाटिका, सन सिटी, दिपाली ले-आऊट, संजीवनगर, शिक्षक कॉलनी, संतोषनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com