Telecommunications sector
Telecommunications sectorSakal

2022 मध्ये दिसणार 5G चा दम! 'या' टेलिकॉम शेअर्समधून मिळेल बंपर परतावा

टेलिकॉम क्षेत्रातील नवीन ट्रेंड
Summary

या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळू शकतो.

Stocks to BUY : 2022 मध्ये टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telecom sector) बरीच अ‍ॅक्‍शन बघायला मिळणार आहे. त्यामुळेच गुंतवणुकीसाठी भारती एअरटेल (Bharti Airtel), इंडस टॉवर (Indus Tower), टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications), स्टरलाइट टेकमध्ये (Sterlite Tech) गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा (Refund) मिळू शकतो. 2022 मध्ये ट्रॅफिक हाइक, 4G सेवेचा विस्तार आणि स्पेक्ट्रम किंमतींच्या कपातीनंतर 5G ऑक्‍शनसारख्या मोठ्या घडामोडी घडतील. या वर्षी डिजिटल सेवांची वाढती व्याप्ती, कमी होणाऱ्या किंमतींची स्पर्धा आणि वाढती ARUP (एव्हरेज रेव्हेन्‍यू पर यूझर) हे टेलिकॉम सेक्‍टरमधील नवीन ट्रेंड असतील असे ब्रोकरेज फर्म CLSA ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Telecommunications sector
टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

5G ऑक्‍शनचे घमासान

टेलिकॉम क्षेत्रात 2022 मध्ये 5G मुळे मोठी खळबळ उडेल. स्पेक्ट्रम लिलावानंतर अनेक कंपन्या 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. 5G स्पेक्ट्रमच्या मोठाल्या किंमती हे एक मोठे आव्हान असणार आहे.

टेलिकॉम क्षेत्रातील नवीन ट्रेंड

एआरपीयू वाढवणे, कमी होणाऱ्या किंमतींचे आव्हान आणि डिजिटल सेवांची वाढती ग्रोथ, विशेषतः अॅप्स आणि पार्टनरशीप्स हे या वर्षाचे नवीन ट्रेंड असतील असे सीएलएसएचे म्हणणे आहे. दुसरीकडे, AGR, 5G स्पेक्ट्रम लिलाव, रिलायन्स जिओचा संभाव्य IPO (RJio IPO) आणि इंडस टॉवर्समधील संभाव्य स्टेक विक्री याबाबतही मोठी हालचाल येत्या वर्षात अपेक्षित आहे.

Telecommunications sector
सर्वोच्च न्यायालयाकडून टेलिकॉम कंपन्यांना दिलासा, थकीत देणी भागवण्यासाठी 10 वर्षांची मुदत

4 घटकांमध्ये वाढ होणार

2022 हे इंडस्‍ट्रीसाठी '5G वर्ष' असेल असे CLSA चे म्हणणे आहे. यावर्षी, टॅरिफ रेट्समधील वाढ, 4G ग्राहकांची वाढ, मोबाइल डेटा आणि महसूल वाढ यामुळे क्षेत्राला चालना मिळेल. त्यांच्या अहवालानुसार, सध्या 46-60 टक्के 4G ग्राहक आहेत. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 4G वापरकर्त्यांची संख्या 83 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com