Akola Municipal Election 2025
esakal
श्रीकांत राऊत, अकोला
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर केल्याने समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. संभ्रम संपवत, आघाडीतील दोन प्रमुख पक्षांनी थेट एकत्र येत निवडणूक रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.