

Mahayuti Resolves Seat Sharing for Akola Civic Polls
sakal
अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपाचा बहुचर्चित तिढा अखेर सुटल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, चर्चा व अंतर्गत मतभेदांनंतर अखेर जागा वाटपावर एकमत झाले असून, यामुळे निवडणूक तयारीला वेग आला आहे.