अकोला : मनपा शाळांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Municipal schools provide education in English medium

अकोला : मनपा शाळांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे

अकोला : विद्यार्थ्यांना मनपा शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजपा नेते डॉ. अशोक ओळंबे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रत्येक नागरिकाला आपला पाल्य इंग्रजी शाळेमधून शिकावा असे वाटत असून, खाजगी शाळांची प्रचंड फी असल्यामुळे त्यांना खाजगी शाळेमधून त्यांच्या पाल्यांना शिकवणे शक्य होत नाही. याउलट मनपाच्या मराठी, हिंदी तसेच उर्दू शाळामध्ये अल्प प्रमाणात प्रवेश होत असल्यामुळे मनपाच्या शाळा ओस पडत असून, लाखो रुपये शिक्षकांच्या पगारापोटी मनपाला खर्च करावे लागत आहेत. अकोला मनपामध्ये मक्तेदारी समजणाऱ्या जनसेवकांच्या शिक्षणाबाबत असलेल्या अनास्थेमुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण यापूर्वीच सुरू व्हायला पाहिजे होते ते सुरू होऊ शकले नाही, ते आता तरी सुरू व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई मनपा शाळेमध्ये चालू वर्षांपासून सीबीएसई अभ्यासक्रम सुरू होत असून, किमान अकोला मनपा शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. यापूर्वी अकोला मनपा शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, विध्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू आगामी सत्र २०२२ पासून मनपा शाळांमधून इंग्रजीमधून संपूर्ण शिक्षण सुरू केल्यास खाजगी शाळेमध्ये जाणारे व फी जास्त असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मनपा हद्दीमधील हजारो विद्यार्थ्यांना मनपा शाळांमधून इंग्रजी माध्येमातून शिक्षण घेता येईल व गेली २ वर्षांपासून कोविड संसर्गामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना न्याय मिळेल, अशी मागणी भाजपा नेते तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांना केली आहे.

आयुक्तांनी पुढाकार घेऊन अकोलेकर जनतेसाठी योग्य निर्णय घेऊन मनपा शाळांमध्ये इंग्रजी माध्येमातून शिक्षण सुरू करून अकोला मनपाला नावलौकिक मिळून ध्यावा, जेणेकरून मनपा अकोला शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करेल, अशी विनंती सुद्धा त्यांनी यावेळी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Akola Municipal Schools Provide Education In English Medium

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top