अकाेला : मूर्तिजापुरात २५ पैकी १३ नगरसेवक महिला!

विशेष सभा घेऊन आरक्षण सोडत
Akola Municipality election Murtijapur
Akola Municipality election Murtijapur

मूर्तिजापूर : येथील नग पालिकेच्या प्रभागांचे आरक्षण आज नगरपालिकेच्या सभागृहातील विशेष सभेत सोडत काढून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार २५ पैकी १३ नगरसेवक महिला असतील. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील या सभेत मुख्याधिकारी तथा प्रशासक सुप्रिया टवलारे, उपमुख्याधिकारी अमोल बेलोटे, सहायक प्रकल्प अधिकारी राजेश भुगूल, कार्यालय अधीक्षक निशीकांत परळीकर, नरेंद्र, फुरसुले, विजय कोरडे यांनी आरक्षण प्रक्रिया पार पाडली. इंदिरा गांधी न.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढल्या व आरक्षण जाहीर करण्यात आले.

त्यानुसार प्रभाग क्रमांक १ अ-अ.जा. महिला व ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ अ-अ.जा. महिला व ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ अ-नामाप्र महिला व ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ अ-नामाप्र महिला व ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ अ-नामाप्र व ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ अ-नामाप्र व ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ७ अ-अ.जा. महिला व ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ अ-अ.जा. व ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ९ अ-सर्वसाधारण महिला व ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १० अ-अ.जा. व ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ११ अ-नामाप्र व ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १२ अ-नामाप्र महिला, ब-सर्वसाधारण महिला व क-सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव झाल्याचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com