अकोला : खाऊचे आमिष देऊन बालिकेचा विनयभंग

न्यायालयाने सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड ठोठावला
Akola Murtijapur atrocities against minor girl
Akola Murtijapur atrocities against minor girlsakal

अकोला - खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा मूर्तिजापूर तालुक्यातील नराधम संदीप अरूण खंडारे (३४) याला न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड सोमवारी ठोठावला.

मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे संदीप अरुण खंडारे याच्याविरुद्ध अल्पवयीन बालिकेचा खाऊचे आमिष दाखऊन स्वतःचे घरात उचलून नेऊन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल होता. पीडितेच्या वडिलांनी ता. १९ फेब्रुवारी २०१६ रोजी या बाबत फिर्याद दाखल केली होती. विद्यमान विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांचे न्यायालयात दोषारोप ठेवण्यात आले होते. प्रकरणात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यांचे आधारे न्यायालयाने नराधम युवकाला दोषी ठवले.

त्याला भा.दं.वी. कलम ३५४ ‘ब’ मध्ये सात वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीने महिने साधी कैद व पोक्सो कायदातील कलम सात-आठमध्ये पाच वर्षे सक्त मजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीने महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपीस सोबतच भोगवयच्या आहेत. पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह सोळंके यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल संजय भरसाकळे व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून सहाय्य केले.

खोटी साक्ष दिल्यामुळे कारवाई

बालिकेच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयातील सुनावणी दरम्यान एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रभुदास ढोरे हा फितूर झाला. त्याच्यावर भा.दं.वी. कलम १९१ नुसार खोटी साक्ष दिल्यामुळे कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com