nana patole
nana patolesakal media

अकोला : मनपा निवडणुकीत काँग्रेसचे ‘स्वबळ’

प्रदेशाध्यक्षांनी दिला तयारी करण्याच आदेश; शिवसेना, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. शिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्ष, संघटनांची मदत न घेता निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करण्याचा आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महानगराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये अकोला महानगरपालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचा आदेश मनपा प्रशासनाला दिला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्प्यात आहे.

कच्चा आरखडा निवडणूक आयोगाकडे येत्या ता. ३० नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे. अकोला मनपात एकूण ३० प्रभागात ९१ सदस्य राहतील. निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत कोणत्याही पक्ष किंवा संघटनेच्या कुबड्या न घेता स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वबळाचा आदेश ता. २४ नोव्हेंबर रोजी महानगराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना सरचिटणीस देवानंद पवार यांच्यामार्फत पोहोचला आहे.

nana patole
आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

कुठलीही तडजोड नाही, स्वबळच! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्ष कुठलीही तडजोड करणार नाही. स्वबळावरच निवडणूक लढविण्याची तयारी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून सुरू करा, असा आदेश नानांनी शहर व जिल्हा काँग्रेस समिटीच्या अध्यक्षांना दिला आहे. सोबतच बुथ कमिट्यांची संपूर्ण तपशीलवार माहितीही प्रदेशाध्यक्षांनी मागविली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सुस्त पडलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे.

काँग्रेस-वंचित आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या विरोधात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेवून नवीन आघाडीची मोट अकोला शहरात बांधेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ता. २४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रात कोणतीही तडजोड न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आदेश काँग्रेसच्या शहर व जिल्हाध्यक्षांना दिल्याने वंचितसोबतच्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

nana patole
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

शिवसेना-राकाँ एकत्र येणार? काँग्रेसचा स्वबळाचा नारा पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या पत्राने बुलंद झाल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बाहेर पडला हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह प्रहार जनशक्ती पक्षाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना-राकाँ हे पक्ष मनपा निवडणूक एकत्र लढण्याची शक्यताही आता अधिक वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com