महाबीजसह सहा मोठ्‌या कंपन्यांचे सोबायीन वाणाचे बियाणे निघाले अप्रमाणित

सुगत खाडे  
शुक्रवार, 17 जुलै 2020

महाबीजसह सहा मोठ्‌या कंपन्यांचे सोबायीन वाणाचे बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. उगवण क्षमता कमी असल्याने बियाण्यांचे नमुने फेल ठरल्याने संबंधित कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित कंपन्यांविरोधात न्यायालयीन खटला दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे.

अकोला  ः महाबीजसह सहा मोठ्‌या कंपन्यांचे सोबायीन वाणाचे बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. उगवण क्षमता कमी असल्याने बियाण्यांचे नमुने फेल ठरल्याने संबंधित कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित कंपन्यांविरोधात न्यायालयीन खटला दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे.

चांगल्या प्रमाणात पिकाचे उत्पादन व्हावे यासाठी शेतकरी उत्तम प्रतिचे बियाणे विकत घेतात. त्यानंतर सुद्धा काही बियाण्यांची उगवण क्षमता निम्न दर्जाची असते. त्यामुळे बियाणे पेरल्यानंतर ते वांझोटे ठरतात. यावर्षी सुद्धा जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे वांझोटे ठरले आहेत. त्यामुळे पेरण्या सोयाबीनचे बियाणे निष्कृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. या स्थितीमुळे कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील कृषी निविष्ठा विक्रेता दुकानात जावून बियाणे, खत व किटकनाशकांचे नमुने घेते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बियाण्यांच्या नमुन्यांपैकी सहा बड्या कंपन्यांच्या आठ बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालानंतर फेल ठरले आहेत. त्यामुळे सदर कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आली असून त्यांच्या उत्तरानंतर न्यायालयीन खटला दाखल करण्याची तयारी कृषी विभाग करत आहे.

या तालुक्‍यात आढळले बियाणे अप्रमाणित
कृषी अधिकाऱ्यांनी सोयाबीनचे नमुने घेतल्यानंतर वरदान बायोटेक, बुस्टर प्लॅन्ट जेनेटीक, महाबीज, केडीएम सिड्‌स, सारस ऍग्रो, प्रगती सिड्‌स इत्यादी कंपन्यांचे जेएस 335 चे वाण प्रयोगशाळेत अप्रमाणित आढळले आहे. संबंधित बियाण्यांचे नमूने पंचायत समिती मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर तालुक्‍यातील कृषी अधिकाऱ्यांनी काढले होते.

 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Soybean varieties of six major companies, including Mahabeej, went uncertified