आजची तारीख भन्नाट, जुळून आला दुप्पट प्रगतीचा योगायोग

Akola News: 051020 Todays date is being discussed on social media
Akola News: 051020 Todays date is being discussed on social media

अकोला  : कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वार, दिनांक, शके, मराठी महिने, इंग्रजी महिने, तिथी, दिनविशेष, शुभदिनांक, त्याज्य दिवस, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारचे मुहूर्त, पाककृती, राशिभविष्य इ. प्रकारची माहिती आपल्याला यातून समजते. असे असले तरी आजचा योग विषेश असल्याने सोशल मीडियावरून दुप्पट प्रगतीच्या शुभेच्छाही देण्यात येत आहेत. 

तर, आजची तारीख आहे 05-10-20. हो, याच तारखेचं निमित्तं करून सोशल मीडियावरून आपल्या मित्रांना त्यांच्या आयुष्यात यशाचे नवनवीन शिखरं पादाक्रांत करावीत म्हणून शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वार, दिनांक, शके, मराठी महिने, इंग्रजी महिने, तिथी, दिनविशेष, शुभदिनांक, त्याज्य दिवस, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारचे मुहूर्त, पाककृती, राशिभविष्य इ. प्रकारची माहिती आपल्याला यातून समजते. 

कॅलेंडरकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपआपला वेगवेगळा दृष्टीकोण असू शकतो. कामाला जाणारे त्यापैकी ज्यांना सुट्टी खूप आवडते ते पहिल्या सुट्टय़ा बघतात. त्यात सण सुट्टीच्या दिवशी आले नाहीत नाही? हे तपासतात; कारण त्यांची एक सुट्टी कमी होते ना! मग उगाचच चूक चूक. काहीजण पूर्व वर्षाचे म्हणजे बारा महिन्यांतील स्वत:ची असलेली राशी-भविष्य वाचून काढतात, त्याची पण गंमत काय, तर शेवटून सुरुवात करतात. काही जण आपल्या वाढदिवसाचे वार बघतात. कामाच्या दिवशी असेल तर हिरमुसतात आणि सुट्टीच्या दिवशी आला की आधीच वाढदिवसाचे नियोजन करण्यास सुरुवात करतात.  

दरम्यान, प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शोधणाऱ्या नेटकऱ्यांनाही बरेचदा गमती जमती सापडतात. तशातलाच आजचा हा योग म्हणावा लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com