शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२ मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 20 November 2020

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात ७७ मतदान केंद्र असणार आहे.

अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात ७७ मतदान केंद्र असणार आहे.

यात वाशिम आणि बुलडाणा येथे दोन सहाय्यकारी मतदार केंद्रे असणार आहेत. तर अकोला जिल्ह्यात १२ मतदान केंद्रातून मतदान करण्यात येईल.

त्यात अकोट तालुक्यात तहसिल कार्यालय अकोट, तेल्हारा तालुक्यात संजय गांधी विभाग गाडेगाव रोड जुने तहसिल कार्यालय तेल्हारा, बाळापूर तालुक्यात पंचायत समिती सभागृह बाळापूर, अकोला ग्रामीणसाठी जि.प. आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. २ अकोला, जि.प. आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. ३ अकोला,

अकोला शहरासाठी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. १ मूर्तिजापूर रोड अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. २ मूर्तिजापूर रोड अकोला, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय खोली क्र. ३ मुर्तिजापूर रोड अकोला,

जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ विद्यालय खोली क्र. १ अकोला, पातूर तालुक्यात संजय गांधी विभाग तहसिल कार्यालय पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात पंचायत समिती सभागृह बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात संजय गांधी विभाग तहसिल कार्यालय मूर्तिजापूर येथे मतदान करण्यात येईल.

(संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 12 polling stations for education constituency elections