रॅपिडच्या १६६ चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 14 October 2020

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता. १३) दिवसभरात झालेल्या १६६ चाचण्या झाल्या, त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

अकोला : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता. १३) दिवसभरात झालेल्या १६६ चाचण्या झाल्या, त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

अकोला ग्रामीण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच अकोट येथे तीन चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

बाळापूर येथे एकाची चाचणी झाली, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मूर्तिजापूर येथे सहा चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोला आयएमए येथे ४१ चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. ७३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे २५ चाचण्या झाल्या, त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हेडगेवार लॅब येथे ११ चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 166 tests of Rapid, eight positive