esakal | रुग्णसंख्या वाढली तरी ऑक्सिजनच्या ६८० खाटा रिकाम्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: 680 oxygen beds empty despite corona outbreak

गत दोन-तीन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे बाधित रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होणेही दुरापास्त झाले होते. मात्र, आता जिल्ह्यातील चित्र बदलत चालले असून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने कोविड रुग्णालयातील ऑक्सीजन बेडच्या ६८० खाटा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता आयसीयू खाटाही बऱ्यापैकी उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

रुग्णसंख्या वाढली तरी ऑक्सिजनच्या ६८० खाटा रिकाम्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः गत दोन-तीन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे बाधित रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होणेही दुरापास्त झाले होते. मात्र, आता जिल्ह्यातील चित्र बदलत चालले असून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने कोविड रुग्णालयातील ऑक्सीजन बेडच्या ६८० खाटा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता आयसीयू खाटाही बऱ्यापैकी उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती.

या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली होती. त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर गेले होते. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा ६० वर जावून पोहचली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते.

परंतु ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून आले. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण १३ ऑक्टोबररोजी आढळले. यादिवशी ३३ रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या प्रतिदिवशी शंभरावर जावून पोहचली होती. मृत्यूचा दर सुद्धा सप्टेंबर महिन्यासह इतर महिन्यात तुलनेत सर्वाधिक होता.

सप्टेंबरमध्ये ६० रुग्णांपेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान ऑक्टोबर पासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कोरोनाचा वेग मंदावला. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या खाटा रिकाम्या होत्या. तिच स्थिती कायम असल्याने जिल्ह्यातील कोरोनाचा धोका व रुग्णसंख्या वाढलेली असली तर रिक्त खाटांमुळे दिलासा मिळाला आहे.


रिक्त असलेल्या ऑक्सिजन खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकूण ४६२ खाटा आहेत. त्यापैकी ३८३ खाटा रिक्त आहेत. जिल्हा महिला रुग्णालयात ५० खाटा असून त्या रिक्त आहेत. मूर्तिजापुरातील शासकीय रुग्णालयातील ४० पैकी ४० खाटा रिक्त आहेत. आरकेटी अकोला येथील ५० खाटा रिक्त आहेत. आयकॉन हॉस्पिटलमध्ये २४ खाटा आहेत. परंतु एकही खाट रिक्त नाही. ओझोनमध्ये १४, अकोला ॲक्सिडेंट क्लिनीकमध्ये १४, यूनिक्यू हॉस्पिटलमध्ये १७, हॉटेल रिजेन्सीमध्ये १४, अवघते हॉस्पिटलमध्ये २०, हॉटेल स्कायलार्कमध्ये ४३, बिहाडे हॉस्पिटलमध्ये १०, सूर्यचंद्र हॉस्पिटलमध्ये २५ अशा एकूण ८३९ आरक्षित खांटापैकी ६८० खाटा रिक्त आहेत. तर १५९ खाटांवर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे

(संपादन - विवेक मेतकर)

loading image