esakal | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावस
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Accused of harassing a minor girl sentenced to three years rigorous imprisonment

शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.आर. भराड यांनी आरोपीला २६ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे सश्रम कारावास सोबतच एक हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.आर. भराड यांनी आरोपीला २६ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे सश्रम कारावास सोबतच एक हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

वाल्मिकीनगरमध्ये ६ सप्टेंबर २०१५ रोजी घडलेल्या घटनेतील २५ वर्षीय शिमोन उर्फ दाद्या राजू इंगळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी न्यायालयीन सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, शहरातील वाल्मिकीनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पीडितेची आई घटनेच्या दिवसी कावड मंडळातील शिवभक्तांना फराळ देण्यासाठी गेली होती.

त्यावेळी पीडिता व तिची बहिण घरात असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास आरोपी दाद्या पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात आला. यावेळी पीडितेसोबत बळजबरीने तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने तीने तेथून पळ काढला.

दरम्यान पीडितेची आई परत आल्यानंतर तीने सदर घटना तिला सांगितल्याने पीडितेच्या कुटुंबाने शहर पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार दिली.

पोलिसांनी त्याच दिवशी आरोपी विरुध्द ३५४ अ (१), ३४१ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

तपासाअंती पीएसआय कल्पना राठोड यांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणी सरकार पक्षाकडून सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाची बाजू विशेष सरकारी अभियोक्ता सूचिता कुळकर्णी (देशपांडे) यांनी मांडली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image