दत्तक मुलगाच निघाला वैरी, शेतीच्या वादातून केली वडीलाची हत्या

संजय सोनोने
Thursday, 8 October 2020

 तालुक्यातील सगोडा येथेही ४ ऑक्टोबर निवृत्ती पुंडलिक दळभंजन (वय ४५) यांचा खून झाला होता. पोलिसांना प्रथम अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाचे चक्र फिरवताच दत्तक पुत्रानेच शेतीच्या वाटणीवरून खून केल्याचे उघड झाले.

शेगाव ( जि. बुलडाणा  :  तालुक्यातील सगोडा येथेही ४ ऑक्टोबर निवृत्ती पुंडलिक दळभंजन (वय ४५) यांचा खून झाला होता. पोलिसांना प्रथम अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाचे चक्र फिरवताच दत्तक पुत्रानेच शेतीच्या वाटणीवरून खून केल्याचे उघड झाले.

शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सगोडा येथे निवृत्ती पुंडलिक दळभंजन हे शेतात मृत अवस्थेत आढळले होते. डॉक्टरांना मृतकाच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसले.

त्यानुसार रुग्णालयातर्फे शेगाव ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभिर्य बघून अकोला येथील तज्ञ डॉक्टरांकडून मृतदेहाची तपासणी केल्यानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले.

अखेर ६ ऑक्टोबर रोजी मृतकाचा दत्तक पुत्र सोपान गजानन दळभंजन (वय २६) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.

वर्षभरापूर्वी निवृत्ती दळभंजन यांच्याशी शेतीच्या वाटणीवरून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून ता. ४ ऑक्टोबर रोजी शेतात गवत आणण्यासाठी एकटे गेलेल्या निवृत्ती दळभंजन यांचा दोरीने गळा आवळून खून केला, असे सोपानने कबूल केले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Adopted son is the only enemy who killed his father in an agricultural dispute