esakal | आजपासून पुन्हा ‘चला माऊली’, आठ महिन्यानंतर भक्तांची ‘श्रीं’ शी ‘गाठ’
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: After lockdown, Gajanan Maharaj temple at Shegaon will open

कोरानामुळे गत आठ महिन्याचे प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेशानंतर राज्यातील मंदिर उघडणार आहेत. त्याअनुशंगाने बुलढणा जिल्ह्यातील संतनगरीतून पुन्हा चला माऊली शब्द कानी पडणार आहेत. तर श्री चे समाधी दर्शनाची भक्तांना ओढ लागली आहे.

आजपासून पुन्हा ‘चला माऊली’, आठ महिन्यानंतर भक्तांची ‘श्रीं’ शी ‘गाठ’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा)   : कोरानामुळे गत आठ महिन्याचे प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेशानंतर राज्यातील मंदिर उघडणार आहेत. त्याअनुशंगाने बुलढणा जिल्ह्यातील संतनगरीतून पुन्हा चला माऊली शब्द कानी पडणार आहेत. तर श्री चे समाधी दर्शनाची भक्तांना ओढ लागली आहे.


मार्च महिन्यात देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देश लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. विदर्भ पंढरी शेगावातील श्री गजानन महाराज संस्थान चे मंदिरही बंद करण्यात आले.

भाविकांची गर्दी सुध्दा थांबली. अनेक चार नंतर विविध राजकीय पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली आणि १४ नोव्हेंब ला दिपावलीचे दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदिरे उघण्याचा निर्णय घेवून भाविकांना सुखद धक्का दिला.

त्यामुळे पुन्हा ‘गण गण गणात बोते...चा गजर ...पुढे चला माऊली...हे शब्द कानी पडणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आठ महिन्यानंतर भाविकांची श्री संत गजानन महाराजांशी गाठ होणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)