दहा वर्षांनंतर एकत्र आला वर्ग, आठवणींची साठवण करून एकमेकांस सहाय्य करण्याची घेतली शपथ

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 1 December 2020

अडगांव बु. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय शाळा येथील २००९-२०१० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दिवाळीचे औचित्य साधून एकत्र येऊन एकमेकांना साहाय्य करण्याची शपथ घेतली.

हिवरखेड (जि.अकोला) : अडगांव बु. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय शाळा येथील २००९-२०१० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दिवाळीचे औचित्य साधून एकत्र येऊन एकमेकांना साहाय्य करण्याची शपथ घेतली.

दहा वर्षापूर्वीचे वर्ग मित्र दिपक रेळे, दिपक घाईट, शेख साबीर, हे वर्ग शिक्षक श्री इंगळे सरांना भेटले व २००९ -२०१० चे सर्व मुले मुलीचा एकत्र ग्रुप तयार केला. ग्रुप तयार करून लग्न झालेल्या मुला मुलीशी बोलून ग्रुप तयार करण्याचे कारण सांगितले. यामध्ये नौकरी करणारे मुले मुलीही समाविष्ट आहेत. या धक्काधकक्कीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतात.

या सुख दुखःत कोणी मदत करत नाही पण आम्ही ऐका वर्गातील मित्र मैत्रीणि एकत्र येऊन वर्गातील एखाद्या मुला मुलीला अडचण आल्यास सर्व मिळून फुलनाही तर फुलाच्या पाकळीची मदत करण्याची शपथ घेतली.

अडचणीत असलेल्याला वर्ग मित्र मैत्रिण सर्व मिळून मदत करावी हे ठरविण्यात आले. याप्रसंगी वर्गातील त्यावेळेचे सर्व जण उपस्थित होते. वैद्यकीय खर्च, लग्न, मंगलकार्य, आजारात मदत, दवाखान्यात जेवण पोहचवणे, इतर अडचणीत मदत करण्याचे ठरविण्यात आले. या प्रसंगी या विद्यार्थ्यांना पाचवी पासून शिकवणारे शिक्षक हजर होते.

या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य आर जी जाधव सर अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक पी. आर. आढाऊ होते. या प्रसंगी शिक्षकाची भाषणे झाली, सर्व विद्यार्थी आपापले अनुभव आठवणी कथन केल्या. यावेळी वातावरण अतिशय भाऊक झाले होते. दहा वर्षा नंतर आपण एकत्रित येत आहोत,

एकमेकास सहकार्य करण्याचे हमी देत आहोत. ही भावना सर्वांच्या मनात होती. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी भावुक होऊन सांगितल्या. आणि ग्रुप मध्ये राहून सर्वांचे सुखदुःख समजेल असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन रोशनी गाडगे व मनीषा धमके यांनी केले तर आभार नागेश तायडे याने मानले. कार्यक्रमात सर्व मित्र मैत्रीणी उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित भोजनाचा स्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: After ten years, the class came together, took an oath to help each other by storing memories