esakal | शेळी घ्या, मेंढी घ्या, गाय घ्या, म्हैस घ्या, आता राज्यात सुरू होणार जनावरांचा बाजार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Animal market to start in Maharashtra

कोरोनामुळे बंद झालेला शेळ्या-मेंढ्या, जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी हिरवी झेंडी दिली असून, त्याबाबतचे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. जनावरांचा बाजार सुरू करण्याबाबत शेतकरी जागर मंचचे कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेकडे मागणी केली होती.

शेळी घ्या, मेंढी घ्या, गाय घ्या, म्हैस घ्या, आता राज्यात सुरू होणार जनावरांचा बाजार

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला  ः कोरोनामुळे बंद झालेला शेळ्या-मेंढ्या, जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी हिरवी झेंडी दिली असून, त्याबाबतचे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. जनावरांचा बाजार सुरू करण्याबाबत शेतकरी जागर मंचचे कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेकडे मागणी केली होती.

त्यांच्या मागणीला यश आले असून, निश्‍चितच ही बाब राज्यभरातील पशुपालकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. राज्यातील शेळ्या-मेंढ्या व जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आहेत.

त्यामुळे त्यांना गरजेपोटी गावतच कमी किमतीत शेळ्या व जनावरे विकावे लागत असून, त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना भरावा लागतो. त्यामुळे हे बाजार तत्काळ सुरू करण्यात यावेत तसेच हरभरा व तुरीचे नाफेडकडील चुकारे अदा करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंचचे संयोजक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांनी ५ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेकडे केली होती.

महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळातर्फे सुद्धा जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अंतर्भूत असणारे शेळ्या-मेंढ्यांचे बाजार राज्यातील सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी, बाहेर वावराताना फेसमास्कचा वापर करणे, समाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थंकणे, धुम्रपान न करणे, मद्यपान न करणे, तंबाखू न खाने, वयक्तिक स्वच्छता इत्यादी बाबींचे पालन करून सुरू करण्यास हरकत नसल्याचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

त्यामुळे लवकर राज्यात शेळ्या-मेंढ्या व जनावरांचे बाजार सुरू होणार असून, त्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)